*मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासआघाडी सरकारच्या कामाबद्दल मोदी सरकारने केले कौतुक*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 



 


मुंबई :- सध्या संपूर्ण देश कोरोना व्हायरसच्या संकटात सापडला असुन केंद्र सरकार आणि राज्य


सरकार कोरोना व्हायरसशी दोन हात करण्यासाठी लागणारे सर्व प्रयत्न करत आहेत.


महाराष्ट्राचे *मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासआघाडी सरकारच्या कामाबद्दल मोदी सरकारने कौतुक केले आहे.*


 


*मुंबई :-* कोरोनाने सर्वात जास्त हाहाकार महाराष्ट्रात आणि विशेष करून मुंबई शहरात घातला आहे.


 


आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर अनेकांनी भिंती व्यक्त केली होती.


 


मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा धारावीमुळे लाखोंच्या घरात जाईल असे सांगितले जात होते. मात्र राज्य सरकारच्या प्रभावी यंत्रणा, योग्य नियोजन आणि व्यवस्थापनामुळे धारावीतील कोरोनाचा हाहाकार थांबवण्यात राज्य सरकार आणि महापालिकेला यश आले आहे,त्यामुळेच केंद्र सरकारने महाराष्ट्रातील ठाकरे सरकारचं कौतुक केले आहे.मुंबईतील धारावी झोपडपट्टीतला कोरोनाचा वाढता शिरकाव रोखण्याचं बलाढ्य आव्हान हे राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेसमोर होतं.


 


मात्र महापालिका आणि राज्य सरकारने धारावीत मोठ्या प्रमाणात राबवलेल्या मोहीमेला यश आलं असुन


 


आता सध्या तरी धारावीतील कोरोनाचा फैलाव थांबवण्यात महापालिका आणि राज्य सरकारला यश आले आहे. या गोष्टीची दखल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील घेतली आहे.


 


धारावी झोपडपट्टीत कोरोनाविरोधात केलेल्या उपाययोजना आणि मोहिमेत मुंबई महापालिकेने योग्य ती पाऊलं उचलल्याने आकडेवारी मध्ये कमालीचा फरक पडला आहे.


 


मे महिन्यात ४.३ टक्के असणारी रुग्णवाढीची टक्केवारी ही जून महिन्यात १.२ टक्क्यांपर्यंत खाली उतरली आहे. या उतरत्या आकडेवारी मुळे आरोग्य मंत्रालयानेही मुंबई महापालिकेच्या धारावी पॅटर्नचं कौतुक केलं आहे.