शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापनदिनानिमित्त शिवसेना पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विभागाच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापनदिनानिमित्त व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवाहनानुसार शिवसेना पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विभागाच्यावतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले . पुणे लष्कर भागातील कोळसे गल्ली येथील नवमहाराष्ट्र व्यायाम मंडळाच्या आवारात हे रक्तदान शिबीर संपन्न झाले . या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांच्याहस्ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले . या रक्तदान शिबिराचे आयोजन शिवसेना शाखाप्रमुख योगेश होळकर व धनंजय नागवडे यांनी केले . यावेळी शिवसेना पुणे कॅन्टोन्मेंट विभागप्रमुख राजेंद्र शहा , उपविभाग प्रमुख अजय परदेशी , शाखाप्रमुख राजेश पुरम , शाखाप्रमुख अजय भांबुरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते .


 


या रक्तदान शिबिरामध्ये ८० बाटल्या रक्त जमा झाले. तर रक्तदान शिबिरासाठी नवमहाराष्ट्र व्यायाम मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले . पुना ब्लड बँकेच्या वैद्यकीय पथकाने रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले . रक्तदान केलेल्याना मास्क , सॅनेटायजर , अल्पोपहार व प्रमाणपत्र देण्यात आले .  


Popular posts
*माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस ना.डॉ.गोऱ्हे यांनी केले पुष्पहार अर्पण...*
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
कोरोना विषयी काळजी म्हणून .......दशक्रिया विधीस उपस्थित न राहणे बाबत*...
Image
माथेरानच्या डोंगरातील कड्यावरचा गणपती खुणावतोय.. निसर्गराजा गणपती नावाने फेमस गणपती बाप्पा मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना
श्री शंतनु भामरे यांची *राष्ट्रीय चेअरमन संशोधन आणि विकास सेल आणि राष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी* निवड - अखिल भारतीय सुवर्ण संस्था सामाजिक विकास व संशोधन संस्था ( ABSSVSS)