नेरळ मध्ये दोन नवीन रुग्ण...  पोलीस अधिकाऱ्याचा अहवाल चुकीचा असल्याचे जाहीर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


नेरळ मध्ये दोन नवीन रुग्ण... 


पोलीस अधिकाऱ्याचा अहवाल चुकीचा असल्याचे जाहीर


कर्जत,ता.23 गणेश पवार


                            कर्जत तालुक्यात 22 जून रोजी एकदच मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले होते.आज मात्र त्यात दिलासा मिळाला असून आज केवळ दोनच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.दरम्यान,नेरळ ग्रामस्थांनी काळजी घेण्यासाठी पुढील काळात शासनाच्या आदेशाने नियम पाळून व्यवहार करण्याचे ठरले आहे.


                             कर्जत तालुक्यात आज नेरळ येथील महावितरण कंपनीचा एक कर्मचारी यांचे अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तर ममदापुर येथील 22 जून रोजी मृत पावलेल्या कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णाचा 44 वर्षीय मुलगा यांचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. त्यात ममदापुर गावात आणखी संख्या वाढण्याची शक्यता आहे, कारण ममदापुर येथील मृत झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह महिला यांचा मृतदेह दफन करण्यासाठी ममदापुर येथे आणला होता.त्यामुळे त्या महिलेच्या दफनविधी मध्ये सहभागी झालेले नातेवाईक आणि ग्रामस्थ मंडळी यांना संसर्ग झाला तर काय करायचे ?याबद्दल प्रशासन देखील साशंक आहे. त्याचवेळी नेरळ पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक यांचा अहवाल 21जून रोजी पॉझिटिव्ह आला होता,परंतु त्यांच्या अहवालाबद्दल 22जून रोजी जेजे रुग्णालय कडून पुन्हा अहवाल पाठवण्यात आला आहे.त्यानुसार 35 वर्षीय पोलीस उपनिरीक्षक यांचे अहवाल निगेटिव्ह आले असून त्यांनी नेरळ पोलीस ठाणे येथे आपले काम देखील सुरू केले आहे.त्यात नेरळ पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी आणि 8 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह निघाले असल्याने पोलीस उपनिरीक्षक यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांचा फायदा नेरळ पोलीस ठाणे यांना होणार आहे.


                                नेरळ मधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण यांची वाढती संख्या लक्षात घेता नेरळ मधील व्यापारी आणि नेरळ ग्रामपंचायत यांची नेरळ ग्रामपंचायत कार्यालयात आज बैठक झाली. त्या बैठकीत कोरोना च्या रुग्णांमध्ये होत असलेल्या वाढीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली.त्यात नेरळ ग्रामपंचायत कडून सर्वांना दुकानात आलेले गिऱ्हाईक हे मास्क वापरत नसतील तर त्यांना कोणत्याही प्रकारची वस्तू यांची विक्री करू नये.त्याचवेळी व्यापारी देखील मास्क आणि हँडग्लोज वापरत नाहीत.त्यामुळे सर्वांनी आपले आणि गावचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व्यापारी जो निर्णय घेतील त्याला नेरळ ग्रामपंचायत चा पाठिंबा आहे असे जाहीर केले.बैठकीला ग्रामपंचायत उपसरपंच शंकर घोडविंदे,सदस्य प्रथमेश मोरे,नेरळ व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष कलमेश ठक्कर,माजी अध्यक्ष सावळाराम जाधव, कामगार नेते विजय मिरकुटे, यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी हजर होते.तर या बैठकीत अरविंद कटारिया,नितेश शाह,सलीम तांबोळी,आसिफ अत्तार,बंडू क्षीरसागर,गोरख शेप,विशाल साळुंखे,संदीप म्हसकर,पंढरी हजारे,राजेश वलेचा, यांनी आपली बाजू मांडली.


 


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन
कर्जत तालुक्यातील खांडस येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून....
भगतसिंग कोशियारी यांना राष्ट्रपतींनी*  *परत बोलवावे यासाठी ऑन लाईन पिटीशन*
Image