शेअर बाजाराने तीन महिन्यातील उच्चांक गाठला

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


~ सेन्सेक्स ०.५२% नी वाढला तर निफ्टीने १०,३११ पर्यंत मजल मारली ~


 


मुंबई, २२ जून २०२०: भारतीय शेअर बाजाराने आज बँकिंग, मेटल आणि फार्मा क्षेत्राच्या मदतीने तीन महिन्यातील उच्चांकाला स्पर्श केला. आजच्या इंट्रा डे ट्रेडमध्ये बीएसई सेन्सेक्स ४७९ अंकांनी वाढला. तर निफ्टी ५० निर्देशांकाने इंट्रा डेमध्ये १०,३८६ अंकांची उच्चांकी पातळी गाठली. आजच्या व्यापारी सत्राच्या अखेरीस, बीएसई सेन्सेक्स ३४,९११ पर्यंत पोहोचला. तो ०.५२ टक्क्यांनी वाढला. निफ्टीही ०.६५ टक्क्यांची वाढ घेऊन १०,३११ वर स्थिरावल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले.


 


बाजाराच्या विस्तृत कामगिरीत मिड आणि स्मॉल कॅप या दोन्ही निर्देशांकांनी बेंचमार्क्सवर चांगली कामगिरी केली. एसअँडपी बीएसई मिडकॅप इंडेक्स २ टक्क्यांनी वाढला. एसअँडपी बीएसई स्मॉलकॅपनी १.४ टक्क्यांची वृद्धी दर्शवली.


 


कोटक महिंद्रा (४.१४%), आयसीआयसीआय बँक (१.०७%), बजाज फायनान्स (५.३४%), अॅक्सिस बँक (३.१३%) आणि बजाज ऑटो हे टॉप सेन्सेक्स मूव्हर्स ठरले. तर टीसीएस, ओएनजीसी आणि एचडीएफसी हे आजच्या व्यापारी सत्रातील टॉप लूझर्स ठरले.


 


निफ्टी आयटी इंडेक्स वगळता सर्व क्षेत्रांमध्ये आज वृद्धी दिसून आली. निफ्टी पीएसयू बँक इंडेक्समध्ये जवळपास ४ टक्क्यांची वाढ झाली. तर निफ्टी प्रायव्हेट बँक, फार्मा, मिडिया, मेटल आणि बँक निर्देशांकसुद्धा प्रत्येकी १.७ ते २.७ टक्क्यांनी वाढलेले दिसले.


 


वैयक्तिक स्टॉक्सपैकी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स हेदेखील उच्च कामगिरी दर्शवणारे ठरले. त्याच्या समभागांनी २७ टक्क्यांची वृद्धी घेतली. कंपनीने फेविपिरॅविल हे अँटीव्हायरल औषध लाँच करण्याचे सांगितल्यावर बीएसईवर हे शेअर्स ५२० रुपयांपर्यंत पोहोचले.


 


रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्टॉक्सनी आजच्या व्यापारी सत्रात नवी उंची गाठणे कायम ठेवले. बीएसईवर या स्टॉक्सनी आज कार्यकाळात प्रथमच १,८०४.१० रुपयांची उंची गाठली. कंपनी मार्केट कॅप १५० अब्ज डॉलर मूल्याची पहिली भारतीय संस्था ठरली. कंपनीचे स्टॉक्स आज १,७४८ रुपयांवर पोहोचले.


 


कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेच्या चिंतेने जागतिक शेअर्स आज नकारात्मक स्थितीत सुरू झाले. जपानमधील निक्केईचा विर्देशांक आजच्या व्यापारी सत्रात ०.१% नी घसरला, हाँग काँगमधील हँग सेंगचे शेअर्सदेखील ०.५% नी खाली आले. सेउलच्या केओएसपीआयचा निर्देशांकही ०.६% नी घसरला. युरोपियन स्टॉक्स ०.३ टक्क्यांनी घसरले तर यूएस स्टॉक फ्यूचर्सदेखील ०.८ टक्क्यांनी वाढले.


Popular posts
*माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस ना.डॉ.गोऱ्हे यांनी केले पुष्पहार अर्पण...*
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
कोरोना विषयी काळजी म्हणून .......दशक्रिया विधीस उपस्थित न राहणे बाबत*...
Image
माथेरानच्या डोंगरातील कड्यावरचा गणपती खुणावतोय.. निसर्गराजा गणपती नावाने फेमस गणपती बाप्पा मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना
श्री शंतनु भामरे यांची *राष्ट्रीय चेअरमन संशोधन आणि विकास सेल आणि राष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी* निवड - अखिल भारतीय सुवर्ण संस्था सामाजिक विकास व संशोधन संस्था ( ABSSVSS)