श्रीमद् राजचंद्र लव्ह अ‍ँड केअरतर्फे १७ हजार ९०० गरजूंना अन्नपदार्थांचे वितरण

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


-


 


पुणे :-  श्रीमद् राजचंद्र मिशन धरमपूर यांच्या पुणे केंद्राचा पुढाकार ; पूज्य गुरुदेव श्री राकेशभाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे रेल्वे स्थानकावर फूड पाकिटांचे वितरण


 


पुणे : श्रीमद्् राजचंद्र मिशन धरमपूर यांच्या पुणे केंद्रातर्फे श्रीमद्् राजचंद्र लव्ह अ‍ँड केअरच्या पुढाकाराने पुणे शहरात विविध ठिकाणी १७ हजार ९०० गरजूंना अन्नपदार्थांचे वितरण करण्यात आले. पुण्यात ४१ हजार ६०० थेपले, १ हजार ५०० बिस्किट व चिवडा पाकिट, ६ हजार पेय पाकिटे गरजूंना देण्यात आली.  


 


पुणे रेल्वे स्थानकावरही संस्थेच्या स्वयंसेवकांनी फूड पाकिटांचे वितरण केले. तसेच मुंबईतही प्रवासी मजुरांना मदत देण्यात आली. सर्व गरजूंना भावनिकरित्या देखील आधार मिळावा, याकरीता कार्यकर्त्यांनी अनेक पाकिटांवर चांगले संदेश लिहिले होते. पुणे रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक ए.के.सिन्हा यांनी या उपक्रमाबद्दल मिशनच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन देखील केले. 


 


मागील दोन महिन्यात लॉकडाऊन असल्याने अनेक स्थलांतरित कामगार, दैनंदिन वेतन कामगार व मुक्या प्राण्यांनाही मोठा फटका बसला. त्यामुळे श्रीमद्् राजचंद्र लव्ह अ‍ँड केअर चे संस्थापक पूज्य गुरुदेवश्री राकेशभाई यांच्या प्रेरणेतून हजारो कार्यकर्त्यांनी जगभरातील ५० शहरांमध्ये सेवा देत मदतही केली आहे. पुण्यासह देशभरात मदतीचा हात देण्यासोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून ध्यान व योगाचे मार्गदर्शनही केले जात आहे.


 


*फोटो ओळ : श्रीमद्् राजचंद्र मिशन धरमपूर यांच्या पुणे केंद्रातर्फे श्रीमद्् राजचंद्र लव्ह अ‍ँड केअरच्या पुढाकाराने पुणे शहरात विविध ठिकाणी १७ हजार ९०० गरजूंना अन्नपदार्थांचे वितरण करण्यात आले. पुणे रेल्वे स्थानकावरील क्षणचित्र