कर्जत तालुक्यातील 24 रुग्ण कोरोना मुक्त... एकाची भर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 कर्जत,ता.13 गणेश पवार


                           कर्जत तालुक्यात तब्बल 24 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आज आणखी एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडली आहे.दरम्यान,कर्जत तालुक्यात 35 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत,तर कर्जत पोलीस कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेले पोलीस यांच्या कोरोना टेस्टबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.


                      कर्जत तालुक्यात आज आणखी एका तरुणाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.नेरळ विद्या मंदिर शाळेच्या समोर असलेल्या ममदापुर ग्रामपंचायत भागातील गोकुळधाम इमारतीत राहणारा तरुण मुंबई मध्ये नोकरी करीत आहे. शिपिंग मध्ये नोकरी करीत असलेला हा तरुण 28 मे रोजी आपल्या घरी आला.त्यानंतर त्या 38 वर्षीय तरुणाला ताप आल्याने नेरळ गावातील खांडा भागातील खासगी डॉक्टरकडे गेले होते.तेथे उपाचार घेऊन घरी परतलेला तरुणाला पुन्हा एकदा ताप आल्याने 5 जून रोजी हा तरुण बदलापूर येथील दुबे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेले.मात्र तेथे त्या तरुणाला लक्षणे दिसू लागल्याने त्या तरुणाला पालिकेच्या दुबे रुग्णालयकडून उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये भरती केले.तेथे त्या तरुणाची कोरोनाची टेस्ट करण्यात आली आणि त्या टेस्टचे अहवाल पॉझिटिव्ह आले. 


                             नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राने त्या तरुणाबद्दल माहिती मिळताच सतर्क होऊन गोकुळधाम इमारतीत जाऊन त्या तरुणाच्या पत्नी आणि मुलाला त्याबाबत माहिती दिली.त्या कोरोना पॉझिटिव्ह तरुणाच्या संपर्कात आलेल्या त्या तरुणाला बदलापूर येथे घेऊन जाणारा रिक्षा चालक, तपासणी करणारा नेरळ खांडा येथील खासगी डॉक्टर आणि कुटुंबीय यांची कोरोना टेस्ट आज कर्जत उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली. टेस्ट घेण्यासाठी स्वाब घेण्यात आले असून आजच ते जेजे रुग्णालयात पाठविण्यात आले आहे अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.या तरुणाच्या निमित्ताने कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 35वर पोहचली आहे.मात्र आरोग्य विभागासाठी दिलासादायक बातमी एकच आहे ती म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह एकूण रुग्णांपैकी तब्बल 24 रुग्णांनी कोरोना वर यशस्वी मात केली आहे. उर्वरित 16 रुग्णांपैकी 3 रुग्ण यांचा कोरोना मुळे मृत्यू झाला असून सध्या कोरोना पॉझिटिव्ह 13 रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.


                           तर 11 जून रोजी टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या कर्जत पोलीस ठाण्यातील 32 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह पोलीस रुग्णाला कोरोना वर उपचार घेण्यासाठी मरोळ येथील कोविड पोलीस सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.मात्र कोरोना पॉझिटिव्ह पोलिसाच्या संपर्कात आलेल्या अन्य पोलीसांच्या कोरोना टेस्ट चे अहवाल येणे बाकी असून त्याबद्दल कर्जत शहरात आणि पोलिसात भीती आणि कुतूहल लागून राहिले आहेत. त्याचवेळी नेरळ मोहाचीवाडी येथील कोरोना पॉझिटिव्ह तरुणाच्या संपर्कात आलेल्या सहा जणांच्या कोरोना टेस्ट चे अहवाल देखील येणे बाकी आहे,त्यामुळे नेरळ मध्ये देखील भीतीचे वातावरण आहे.


Popular posts
कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर 5 टक्के कॅशबॅक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाहनधारकांसाठी 11 जानेवारी, 2021 पासून सवलत योजना
झीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*
BLaCK PAPPER PANT*💕💕💕
Image
मानव आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उत्तर प्रदेश हाथरस येथील "मनिषा वाल्मिकी" दलित पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंड गार्डन चाैकात कँन्डल लावून श्रद्धांजली वाहण्यात आली...
Image
राजमुद्रा प्रतिष्ठान !!🚩🚩     !! निलेश म निम्हण मित्र परिवार !!........... दिवस_ 33...             दिनांक 1/5/2020
Image