पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पिंपरी ११ जुन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या वतीनं पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आले होते. . या शिबिरांमध्ये पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शहरातील शेकडो नागरिकांनी रक्तदान केले. सामाजिक जाणीवेतून मोठ्या संख्येनं रक्तदान शिबिरांना प्रतिसाद मिळाल्याबद्दल शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी रक्तदात्याचे व राष्ट्रवादी लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांचे आभार मानले.
यावेळी सोशल डिस्टंन्सीगचे पालन करत हा उपक्रम पार पाडला. तर सहभागी रक्तदात्यांना राष्ट्रावादी पक्षाच्या वतीने सॅनिटायझर, मास्क, आयुर्वेदिक 'अल्बम ३०' गोळ्या, वृक्ष, प्रशस्तिपत्रक देऊन त्याचा सन्मान केला. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते नाना काटे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक दत्ता साने, जावेद शेख, प्रवक्ते फजल शेख, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, विद्यार्थी संघटनेचे सुनील गव्हाणे, वर्षा जगताप, विशाल काळभोर, प्रदीप गायकवाड, महेश झपके आदी मान्यवरानी भेटी दिल्या.
‘कोरोना’ च्या साथीमुळे राज्यामध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. सामाजिक कर्तव्य पार पाडण्यासाठी ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन करावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शहरात पिंपळे सौदागर, नवी सांगवी, पिंपरीगाव, वाकड, आकुर्डी, निगडी, उद्यमनगर, भोसरी, चऱ्होली, लालटोपीनगर मोरवाडी या भागात अंदाजे ३०० ते ४०० दरम्यान रक्तदात्यांनी शिबिरांमध्ये सहभाग नोंदवून रक्त संकलन अभियानात राष्ट्रवादीचे नगरसेवक, युवकचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोलाचे योगदान दिले.