मराठी रामायण लवकरच फक्त ‘स्टार प्रवाहवर’

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


  


तांत्रिक अडचणीमुळे मराठी ‘रामायण’ची प्रसारण तारीख पुढे ढकलण्याचा स्टार प्रवाह वाहिनीचा निर्णय


 


 


 


स्टार प्रवाहवर पहिल्यांदाच मराठीतून भेटीला येणाऱ्या ‘रामायण’ या पौराणिक मालिकेची प्रचंड उत्सुकता आहे. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे मालिकेची प्रसारण तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय स्टार प्रवाह वाहिनीने घेतला आहे. यासंबंधीचं अधिकृत परिपत्रक स्टार प्रवाहकडून जाहीर करण्यात आलं आहे. 


 


दिनांक 1 जूनपासून, आम्ही मराठी रामायण ही मालिका आपल्या स्टार प्रवाह वाहिनीवर दाखवणार होतो पण ह्या संकटाच्या काळात, तांत्रिक अडचणीमुळे ही मालिका प्रसारित करण्यास विलंब होत आहे.


 


आपण जाणताच रामानंद सागर कृत रामायण ही मालिका मूळ हिंदीत आहे, मायमराठीत रामायणाचा दर्जेदार अनुभव देणे आम्ही आमचे कर्तव्य आणि जबाबदारी समजतो. होणाऱ्या विलंबाबद्दल आम्ही क्षमस्व आहोत.


 


लवकरच मायबोलीतील रामायण आम्ही आपल्या भेटीला घेऊन येणार आहोत..आपण आमच्यासोबत आहातच, विश्वास आणि आपल्या संयमाबद्दल आम्हाला खात्री आहे...जय श्रीराम !


 


 


 


मराठी परंपरा, मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपत घराघरात पोहोचलेल्या स्टार प्रवाह वाहिनीने नेहमीच दर्जेदार मालिका सादर केल्या आहेत. त्यामुळेच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेली ‘रामायण’ ही मालिका पहिल्यांदाच मराठीतून दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला. रामानंद सागर निर्मित रामायण ही पौराणिक मालिका पहिल्यांदाच मराठी भाषेतून स्टार प्रवाहवर पहाता येणार आहे. या पौराणिक मालिकेची जादू इतक्या वर्षांनंतर तसूभरही कमी झालेली नाही. आजही प्रेक्षकांना ही मालिका तितकाच आनंद देते. रामायण ही फक्त मालिकाच नाही तर हा मनामनात रुजलेला संस्कार आहे. अलौकिक निष्ठा, पवित्र प्रेम, आणि असामान्य श्रद्धेची गोष्ट पहिल्यांदाच मराठीतून अनुभवायला मिळणं ही प्रेक्षकांसाठी अनोखी पर्वणी असेल. लवकरच ही महामालिका स्टार प्रवाहवर सुरु होणार आहे.