श्री. दीपक बुंदेले यांच्या छंदाची इंडिया बूक ऑफ रेकॉर्डस व आशिया बूक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद झाली आहे.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल........ उद्धव बाळासाहेब ठाकरे


 


मुख्यमंत्री महाराष्ट्र


 


मंत्रालय मुंबई ४०० ०३२


 


८ मार्च २०२०


 


सन्मान पत्र


 


श्री. दीपक प्रकाश बुंदेले, पुणे हे लेखन, वक्तृत्व, छायाचित्र अथवा इतर कोणत्याही क्षेत्रात बुद्धी व मेहनतीच्या जोरावर दैदीप्यमान कामगिरी करत असतात.


 


श्री. दीपक बुंदेले हे वेगळ्या संग्रहाने प्रसिद्ध झाले आहेत. साधारणपणे २० वर्षापासून ते विविध वर्तमान पत्रात लेखन करीत आहेत. हे सर्व ते केवळ आवड व समाजकारणाची तळमळ म्हणून करीत आहेत.


   1. यातूनच त्यांना युवा भारत पुरस्कार, पत्र-मित्र पुरस्कार, गौरव पुरस्कार, व असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यातच त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जात आहे. . ते जवळपास वेगवेगळ्या क्षेत्रातील १३०० व्यक्तींना प्रत्यक्ष भेटले आहेत. व त्यांच्यासोबत छायाचित्रही घेतेलेले आहेत. अश्या विक्रमवीर बुंदेले यांचे अनेक वृत्तपत्रात मुलाखतीही प्रसिद्ध झाल्या असुन अनेक टीव्ही चॅनेल व आकाशवाणीवरही मुलाखती झालेल्या आहेत. श्री. दीपक बुंदेलेचे कौतुक करावे तितके कमीच आहे.


 


इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद झाल्याबद्दल अभिनंदन व शुभेच्छा !


 


आम्ही आपल्याला विभूषित करून हे सन्मानपत्र समर्पित करीत आहोत. आपल्या या अतुल्य, अदवितीय केलेल्या योगदानासाठी हे सन्मानपत्र देत आहोत.