पुणे प्रवाह न्युज पोर्टल
किराणा दुकांदारानकडून ग्राहकांची लूट ..
चढ्या दरात जीवनावश्यक वस्तूची विक्री


कर्जत,ता.28 गणेश पवार
कर्जत तालुक्यात शहरी तसेच ग्रामीण भागात ही किरकोळ किराणा दुकानदार,व्यापारी 'माला' च्या कमतरतेचे कारण सांगत जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती भरमसाठ वाढ करून ग्राहकांना लुटत आहेत.रोजच्या स्वयंपाक करताना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू ,कडधान्य,डाळी,मसाले, तेल ,भाजीपाला,चढ्या दरात विक्री करत आहे .
खेदाची बाब म्हणजे वर्षोनुवर्षे याच सर्वसामान्य ग्राहक राज्याच्या जीवावर आपला व्यवसाय करून संपत्ती कमावलेल्या दुकानदार ,व्यापारी या संकटसमयी ग्राहक राज्याची लूट करतांना दिसत आहेत, सरकारच्या सुचनांना धाब्यावर बसवून चढ्या किमतीची 'पुडी'बांधून ग्राहकांच्या हाती ठेवत ग्राहक राजाचा 'भाव ' कमी करतांना दिसत आहेत, 'परवड असेल तर घ्या ...नाहीतर घरी जा..... असे शब्द ही ग्राहकांना ऐकावे लागत असल्याचे विदारक चित्र दिसुन येते ,नाईलाजाने पोटाची भूक भागवण्या करता खिश्यातील चार वस्तू साठी आणलेल्या पैशात एक- दोन वस्तू घेऊन घरी परतावे लागत आहे.
दुकानदार जरी आपली 'माणुसकी' तराजू वर तोलत ग्राहकांना लुटत असले तरी ,समाजातील काही दानशूर लोक ,सामजिक संस्था,राजकीय पुढारी, मदतीचा हात पुढे करत गोरगरिबांना मदत करतांना दिसत आहेत.कर्जत तालुक्यात ही अनेक सेवा भावी संस्थानी, दानशूरांनी आपापल्या परीने तालुक्यातील आदिवासी भागात मदत पोहचवली आहे.मात्र इतर समाजातील सर्व सामान्य लोकांना गरज असूनही केवळ प्रतिष्ठा जपण्यासाठी ही लोक मदत स्वीकार करायला पुढे येत नाही तसेच मदत आदिवासी समाज बांधवांकडे जास्त दिसून येतो.त्यामुळे इतर मध्यमवर्गीय लोकांना मदतीची खरेतर गरज असल्याचे जाणवते,केवळ सरकारी 5 किलो तांदुळाच्या आधारावर त्यांना या पुढे आपला 'उदरभरन'करणे कठीण जाणार आहे .कारण एक महिन्यापेक्षा अधिक काळ लॉकडाऊन लागू आहे.कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याने लॉक डाऊन चे निर्बंध अजून किती काळ राहतील हे सांगता येत नाही.ते येणारा 'काळ'च ठरवेल.
परिणामी या सर्वसामान्य मध्यम वर्गीय लोकांची 'जमापुंजी'या वाढत्या महागाईने अधिक काळ शिल्लक राहणार नाही .त्यांच्या वर ही उपासमारीची वेळ आहे .त्यामुळे यांच्या पर्यंत ही सामाजिक संस्थांनी ,दानशूर व्यक्तींनी काही मदत पोहचवावी अशी मागणी होत आहे.तालुक्यातील ग्रामीण भागात दुकानदारा कडून किराणा सामानाचे भाव अवाच्या सव्वा वाढवले आहेत, परिणामी सर्व सामन्याची या लॉक डाऊन च्या काळात कोंडी होत आहे ,या संकटाच्या वेळी ग्राहकांची होणारी लूट थांबविण्यासाठी प्रशासनाने काही कारवाई करणे आवश्यक आहे.