कोरोना बाधित रुग्णाणवर उपचारार्थ नवले व राव रुग्णालयांचा पुढाकार,

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कृपया प्रसिद्धीकरिता,
१२/०५/२०२०,


कोरोना बाधित रुग्णाणवर उपचारार्थ नवले व राव रुग्णालयांचा पुढाकार,
कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणेकरिता पुणे सातारा रस्ता,बिबवेवाडी येथील राव नर्सिंग होम,व नर्हे येथील श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय,यांनी पुणे महानगरपालिकासह "सामंजस्य करारावर",सह्या केल्या,
राव नर्सिंग होम यांच्या वतीने डॉ,हरिषचन्द्र साखरे,मुख्य कार्यकारी अधिकारी व श्री,जगदीश गरदास यांनी व श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांच्या वतीने येथील अधिष्ठाता डॉ, शालिनी प्रवीण सरदेसाई व डॉ,मधुकर जगताप वपुणे महानगरपालिकेच्या वतीने मा,रुबल अगरवाल,अतिरिक्त महापालिका आयुक्त ( जनरल ) व डॉ,रामचंद्र हंकारे यांनी सामंजस्य करारावर सह्या केल्या,या प्रसंगी मनपाच्या सहाययक आरोग्यप्रमुख डॉ,अंजली साबणे व अन्य अधिकारी उपस्थित होते,
कराराअंतर्गत महत्वाच्या अटी-शर्ती खालील प्रमाणे,
- सदर हॉस्पिटलमार्फत पुणे शहरातील पुणे मनपाने शिफारस केलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाणच्या उपचारासाठी ३५,बेड आरक्षित करण्यात येतील,
- रुग्णाणवर शासनाच्या नियमानुसार रुग्णालयाने औषधोउपचार करणे,
-वरील योजनेच्या व्यतिरिक्त पुणे मनपाच्या कार्यक्षेत्रातील कोरोना बाधित रुग्णनांना पुणे मनपाच्या अंशदायी वैद्यकीय योजनेच्या दराप्रमाणे औषधोउपचार करणे,
-पुणे मनपा कार्यक्षेत्रातील कोरोनाबाधित रुगणाच्या बिलांची पूर्तता पुणे मनपाने तीन महिन्यात करणे,
-पुणे मनपाने रुग्णालयास सुरवातीपासून पीपीई किट्स, 
N-95, मास्क पुरविणे,
-रुग्णालयातील मनुष्यबळ,औषधे,उपकरणे व इतर साधनसमुग्रीची जबाबदारी,रुग्णालयाची राहील,तसेच रुग्णालयातील कर्मचारीवर्ग,डॉक्टर,यांचे वेतन,मानधन,विमा, व औषधे व उपकरणे यांच्या खर्चाची जबाबदारी रुग्णालयांची राहील,
-रुग्णालयांची सुरक्षा सेवा,व स्वच्छता सेवा, निर्जंतुकीकरण,व जैविक कचरा व्यवस्थापन,याबाबतीत संपूर्ण जबाबदारी रुग्णालयाची राहील,
-सामंजस्य कराराचा कालावधी हा सहा महिन्यांचा राहील,
-नैसर्गिक आपत्ती,भूकंप,आरोग्य आणीबाणी अशा नैसर्गिक कारणामुळे अपयशास किंवा विलंबास कोणताही पक्ष जबाबदार रहाणार नाही,
याप्रमाणे प्रमुख अटी शर्ती रहातील,दोन्ही रुग्णालयाकरिता या अटी शर्ती  आहेत,
श्रीमती काशीबाईं नवले वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांच्या वतीने कोरोना ग्रस्त रुग्णांचे उपचाराकरिता ,५०,आयसोलेशन बेड, व २, आय सी यु बेड आरक्षित ठेवण्यात येतील,
अटी- शर्ती वरीलप्रमाणेच रहातील,
-संजय मोरे,
माहिती व जनसम्पर्क अधिकारी,
पुणे महानगरपालिका,
१२/०५/२०२०,


Popular posts
तरुणांनी राज्यशासन व केंद्राच्या योजनेचा लाभ घेवून उद्योजक बनावे – पी.टी काळे
Image
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी झेंडा फडकावण्या मध्ये फरक काय
Image
साहेब मी एक  साधा  पत्रकार आहे..* कर्जत माथेरान नेरळ   :  गणेश पवार दै.शिवतेज✍️
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image