संभाजी ब्रिगेडचे नेते कै.शांताराम (बापू) कुंजीर यांचे दुःखद निधन..... सा.पुणे प्रवाहाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली💐🌷🙏🙏🙏

पुणे.प्रवाह न्युज  पोर्टल


 


++ दुःखद बातमी  ++


कळविण्यास अत्यंत वाईट वाटते की संभाजी ब्रिगेडचे ज्येष्ठ नेते मा. शांताराम बापू कुंजीर, पुणे यांचे काल रात्री उशिरा हृदय विकाराने दुःखद निधन झाले आहे. दिवंगत नेते शांताराम बापू मराठा महासंघ, मराठा सेवा संघ , मराठा क्रांती मोर्चा सह विविध पुरोगामी चळवळीचे प्रणेते होते. मराठा आरक्षण सह शेकडो आंदोलनात सहभागी होते. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेकदा जेल मध्ये जावे लागले. दिवंगत शांताराम बापू मराठा समाजातील पूर्ण वेळ काम करत होते...
शांताराम बापू यांच्या जाण्याने केवळ त्यांच्या कुटुंबीयांचेच नाही तर समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. ते महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना पुणे येथे हक्काचे आधार होते. 
अंत्यविधी आज ५-५-२०२० रोजी मंगळवारी पुणे येथे आयोजित करण्यात येतील. कृपया संभाजी ब्रिगेडचे अजय भोसले -९९२२९०९१९८ यांच्या संपर्कात रहावे ....
जिजाऊ सर्व कुटुंबातील मंडळी व नातेवाईक, सहकारी, मित्र मंडळ यांना सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना....
भावपूर्ण शिवांजली....
पुरुषोत्तम खेडेकर चिखली..