पुणे जिल्ह्यातून श्रमिक स्पेशल रेल्वे मध्य प्रदेशकडे रवाना*- जिल्हाधिकारी नवल किशोर राम 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*पुणे जिल्ह्यातून श्रमिक स्पेशल रेल्वे मध्य प्रदेशकडे रवाना*- जिल्हाधिकारी नवल किशोर राम
*लॉकडाऊनमुळे अडकलेले  परराज्यातील १०९३  मजूर  रवाना*
पुणे,  दि 7:   लॉकडाऊनमुळे  वेगवेगळ्या निवारागृहात  असलेल्या मध्य प्रदेशातील १०९३ मजुरांना घेऊन उरळी कांचन (पुणे) ते रेवा (मध्य प्रदेश)  विशेष  रेल्वे   आज सायंकाळी रवाना झाली. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, 
 उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे  यांच्यासह रेल्वे तसेच पोलीस, महसूल प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
पुणे जिल्हा प्रशासनाकडून या प्रवाशांसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून चोख व्यवस्था केली होती. या ठिकाणी त्यांची आरोग्य विभागाकडून तपासणीही करण्यात आली. रेल्वेमध्ये पाठवण्यात येणाऱ्या प्रवाशांना सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक करण्यात आले होते. प्रवाशांसाठी चालवण्यात येणारी ही रेल्वे पूर्णपणे सॅनिटाईज करण्यात आली असून प्रत्येक प्रवाशाने चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल घातला असल्याची  खात्री करुन घेण्यात येत होती. तसेच प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. याशिवाय सोबत  खाद्यपदार्थही देण्यात आले होते.
पुणे जिल्ह्यातून सोडण्यात आलेली ही पहिलीच रेल्वे असून आवश्यकतेनुसार आणखी रेल्वे सोडल्या जातील, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
'भारत माता की जय'च्या घोषणा देवून आणि टाळ्यांच्या कडकडाट करून या प्रवाशांना निरोप देण्यात आला.


Popular posts
*एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, भारततर्फे एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शियसनेस -अल्टिमेट रिअ‍ॅलिटी संशोधन संस्थेचा शुभारंभ सामाजिक बांधिलकीतून होईल संशोधन*
Image
🚩 *शिवराज्याभिषेक* 🚩 *मनामनात* 🚩 *शिवराज्याभिषेक*🚩 *घराघरात*
Image
कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आढावा,
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image