उमरोली ग्रामपंचायतीकडून स्मशानभूमीच्या कामास सुरवात, संरक्षण भिंत व काँक्रीट रस्त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 कर्जत दि. 30 गणेश पवार


 


उमरोली ग्रामपंचात हद्दीत असलेल्या पाली गावाच्या स्मशानभूमीला रस्ता मिळावा अशी ग्रामस्थांची जुनी मागणी होती. या मागणीचा विचार करत उमरोली ग्रामपंचायतीने ग्रामसनिधीचा वापर करून ग्रामस्थांची हि मागणी पूर्णत्वास नेली आहे. यासह याठिकाणी संरक्षण भिंतीचे काम देखील सुरु करण्यात आले आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. 


 


              कर्जत तालुक्यातील कर्जत कल्याण मुख्य रस्त्याजवळ उमरोली हे गाव वसले आहे. या गावात डिकसळ, पाली व आजूबाजूचा परिसर समाविष्ट करत साधारण १३०० लोकसंख्या असलेली उमरोली ग्रुप ग्रामपंचायत निर्माण झालेली आहे. या पैकी पाली येथील स्मशानभूमीला रस्ता व संरक्षण भिंतींची गरज होती. रस्त्यासाठी ग्रामस्थांची मागणी होतीच या मागणीचा विचार करत ग्रामपंचायतीने या कामाला मंजुरी दिली. यासाठी ग्रामनिधीमधून २.९९ लक्ष एवढ्या रकमेची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. या कामाचे भूमिपूजन नुकतेच करून कामास सुरवात करण्यात आली आहे. यावेळी उमरोली ग्रामपंचायत सदस्य प्रसाद भासे, अनंता बांगारी, माजी उपसरपंच दिनेश भासे, अविनाश बोराडे, सचिन गायकवाड, अमर गायकर, दिलीप पाटील, नारायण गायकर, निकेश गायकर, विजय पाटील, कैलास पवार आदी उपस्थित होते. याकामामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय दूर होणार असून त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.