दहिवली तर्फे वरेडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी कैलास विरले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 कर्जत,ता.27 गणेश पवार


                      कर्जत तालुक्यातील दहिवली तर्फे वरेडी ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदावर कैलास विरले यांची बिनविरोध निवड झाली आहे.यशवंत भवारे यांनी आपला उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने आज 27 मे रोजी झालेल्या निवडणुकीत दहिवली ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदावर विरले यांची बिनविरोध निवड झाली.


                      नेरळ जवळील दहिवली तर्फे वरेडी ग्रुपग्रामपंचायतचे तत्कालीन उपसरपंच यशवंत भवारे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा सरपंच चिंधु तरे यांच्याकडे दिला होता.त्यामुळे रिक्त असलेल्या उपसरपंच पदासाठी आज 27 मे रोजी निवडणूक घेण्यात आली. त्यात उपसरपंच पदासाठी वंजारपाडा गावातुन निवडून आलेले कैलास विरले यांचा एकमेव अर्ज अध्यासी अधिकारी सरपंच चिंधु तरे यांच्याकडे दाखल झाला होता.त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या विशेष बैठकीत दहिवली तर्फे वरेडी ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणून कैलास विरले यांची बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी चिंधु तरे यांनी जाहीर केले.या विशेष सभेला मावळते उपसरपंच यशवंत भवारे,महेश मोरगे,राजेंद्र भोईर,किसन जामघरे,निकिता भोईर,अश्विनी चहाड,हर्षद कुंभार,अकिंता विरले,रविता निरगुडा,मेघा कालेकर आदी सदस्य उपस्थित होते.पीठासीन अधिकारी सरपंच चिंधु तरे यांना निवडणूक कामी ग्रामविकास अधिकारी ए.डी.राजपूत यांनी सहकार्य केले.


                       नवनिर्वाचित उपसरपंच विरले यांचे अभिनंदन करण्यासाठी कर्जत पंचायत समितीचे सदस्य आणि माजी सभापती अमर मिसाळ,जेष्ठ कार्यकर्ते विनोद तरे,रमेश कुंभार, दिलिप मिसाळ,सचिन तरे,रघुनाथ भोईर,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.