पुणे विभागातील 558 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी  विभागात कोरोना बाधित 2 हजार 364 रुग्ण                             -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर         

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुणे विभागातील 558 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी 
विभागात कोरोना बाधित 2 हजार 364 रुग्ण
                            -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर 
     
    पुणे दि. 4:-पुणे विभागातील 558 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 364 झाली आहे.  तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 681 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 86 रुग्ण  गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  विभागात 2 हजार 364 बाधित रुग्ण असून 125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 2 हजार 103 बाधीत रुग्ण असून 115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 78 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 135 बाधीत रुग्ण असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 34 बाधीत रुग्ण असून  एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर  जिल्हयात 14 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 103 झाली आहे.  499 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 489 आहे. पुणे जिल्हयात कोरोनाबाधीत एकूण 115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 83 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणा खाली आहेत.
            आजपर्यत विभागात 23 हजार 942 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी  22 हजार 823 चा अहवाल प्राप्त आहे. 1 हजार 119 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी  20 हजार 393  नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून  2 हजार 364 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
         आजपर्यंत विभागामधील 71 लाख 40 हाजर 436 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2 कोटी 79 लाख 65 हजार 967 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 618 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी  संदर्भीत करण्यात आले आहे.
00000


Popular posts
चिखलवाडी येथील जुन्या ड़े्नेज लाईन वारंवार तुंबुन ,सांडपाणी घरात घुसते.....मा.फिरोज मुल्ला
कर्तव्य सामाजिक संस्थे तर्फे देवदासी महिलांना साडी वाटप करून साजरी केली भाऊबीज
Image
चित्रपटांचे अनुदान दीर्धकाळ प्रलंबित असुन अनुदान देणेच्या कामाला चालना देण्यासाठी अतिरिक्त समिती तसेच सिनेकलाकार लोकसाहित्य,नाट्यकर्मी यांना विमा,आरोयसेवा,प्रवास मदत करण्यास शासनाच्या विविध विभागांचे एकत्र प्रयत्न गरजेचे ... उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
Image
माथेरानच्या पर्यटनासाठी आणखी एक पाऊल.... माथेरानची माहिती देणारे अँप लवकरच संगणकावर
Image
दिग्दर्शक श्री सचिन अशोक यादव यांचा कोंदण हा पहिला मराठी चित्रपट आहे जो कोरोना काळात online या https://www.cinemapreneur.com OTT वेबसाईट वर 1अॉगस्ट 2020 ला release झालेला आहे. 
Image