अभिनेत्री अदिती द्रविडचा गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढाकार . . .  स्क्रीनवर नकारात्मक भूमिका साकारणारी हि अभिनेत्री ठरली खऱ्या आयुष्यात हिरो .

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


. .


 


सध्या लॉकडाऊन मुळे अनेक व्यवसाय बंद आहेत, उत्पन्न नसल्याने लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे, अश्यातच अभिनेत्री अदिती द्रविड हिने स्थापन केलेल्या फ्लाय हाय या संस्थेमार्फत मा.मंदार बलकवडे , संगीतकार पियुष कुलकर्णी अश्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढे येत नागरिकांना जीवन आवश्यक वस्तू, औषधे, पोलीस कर्मचाऱ्यांना चहा नाश्ता देत सामाजिक कार्यात पुढाकार घेतला, गेल्या २ वर्षांपासून अदिती सामाजिक उपक्रमात सक्रिय असून तिने स्थापन केलेल्या फ्लाय हाय या संस्थेमार्फत ती अनेक समाजउपयोगी उपक्रम राबवताना दिसते. नुकतेच तिने संस्थेमार्फत गरजूंना १००० फूड किट्स चे वाटप केले असून यापुढेही अधिकाधिक गरजूंना मदत करण्याची इच्छा तिने व्यक्त केली, माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत नकारात्मक पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीने खऱ्या आयुष्यात हिरो असल्याचे या कार्यातून दाखवून दिले आहे.