पुणे प्रवाह न्युज पोर्टल
प्रेस नोट
*इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी मध्ये लर्नीग मॅनेजमेंट सिस्टिम*
पुणे :
कोरोना लॉक डाऊन परिस्थितीत महाविद्यालये बंद असल्यामुळे महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी च्या अध्यापकांनी लर्नीग मॅनेजमेंट सिस्टिम ची अंमलबजावणी करून विध्यार्थ्यांना अध्यापनाची प्रक्रिया सुरु ठेवली आहे.प्राचार्य डॉ. व्ही. एन. जगताप यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
डिप्लोमा इन फार्मसी या कोर्सचा अभ्यासक्रम मार्च दुसऱ्या आठवड्यामध्ये संपलेला आहे. तरीही सर्व अध्यापकांनी बाइंडर एन्टरप्राईझ व्हर्जन, गूगल क्लासरूम आणि गो ब्रँच या वेबसाइटचा प्रभावी वापर करून विध्यार्थ्यांसाठी आभासी वर्ग (virtual classroom) तयार केली आहे. यामध्ये विध्यार्थाना अवघड विषयांचे मार्गदर्शन, पुस्तके, नोट्स, प्रश्नावली पाठवण्यात येत आहे. हि प्रश्नावली विध्यार्थांकडून ऑनलाईन सोडवून लगेच निकाल पण देण्यात येत आहे.
यासाठी अध्यापकांनी बाईंडर चे 'Educational Institutes under lockdown - byndr the solution' तसेच डॉ. सतीश पोलशेट्टीवार यांचे 'How to engage Pharmacy students with IoT Tools' या विषयावरील ऑनलाईन वेबिनार मध्ये उपस्थिती दर्शविली. यांच्या मार्गदर्शनामुळे अध्यापक विध्यार्थांची उत्तम प्रकारे तयारी करून घेत आहेत.
येणाऱ्या काळात परिस्थिती अशीच बिकट राहिली तर अध्यापकांनी आपल्या ऑडिओ एंबेडेड पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी तयारी सुरु केली आहे.
विध्यार्थी हे प्रार्थमिक भागधारक असून त्यांच्या अध्यापन, शिक्षण आणि मूल्यमापन प्रक्रियेत व्यत्यय न आणता आणि वेळ न घालवता त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एम. सी. इ. सोसायटीच्या इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी चे सर्व अध्यापक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण प्रक्रियेमध्ये गुंतले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणावरील अतिरिक्त खर्च वाचेल आणि ते आत्मविश्वासाने त्यांचे करिअर करू शकतील, असे डॉ.व्ही.एन. जगताप यांनी सांगीतले.
यासाठी अध्यापकांना एम. सी. इ. सोसाटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार , सहसचिव प्रा. इरफान शेख व इंस्टीट्युटचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. जगताप यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले.
................................................