जैविक अस्त्र म्हणूनच चीनकडून कोरोना निर्मिती

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


जैविक अस्त्र म्हणूनच चीनकडून कोरोना निर्मिती
___________________________________


चीनने आपल्या वुहान पी 4 प्रयोगशाळेत जैविक अस्त्र म्हणूनच कोरोना विषाणू तयार केला. इतर देशांतून संहार घडवून आणणे हेच चीनचे यामागचे उद्दिष्ट होते. पण काही कारणांमुळे विषाणू वुहानमधील पी 4 प्रयोगशाळेतून बाहेर पडला आणि वुहानमधून हुबेई प्रांतात फोफावला. जैविक अस्त्र कायद्याचे जनक डॉ. फ्रान्सिस बॉयल यांनी हा आरोप केला आहे. 


डॉ. फ्रान्सिस यांनी एका मुलाखतीत सांगितले की, वुहान कोरोना विषाणू तयार करणे हा जैविक अस्त्र कायद्यानुसार चीनने केलेला गुन्हा आहे. मानवतेविरुद्ध अपराधाच्या श्रेणीत मोडणारा हा गुन्हा आहे. हा गुन्हा घडत असताना जागतिक आरोग्य संघटना जणू मूक साक्षीदार बनलेली होती आणि पुढेही या संघटनेने हीच भूमिका बजावली, हे आणखीच गंभीर आहे.


फ्रान्सिस हे ‘इल्लिनॉईस कॉलेज ऑफ लॉ’मध्ये आंतरराष्ट्रीय कायदा या विषयाचे प्राध्यापक आहेत. अमेरिकेतील जैविक अस्त्र परिषदेदरम्यान त्यांनी देशांतर्गत अंमलबजावणीसाठी ‘बायोलॉजीकल वेपन्स अँटी टेररिज्म अ‍ॅक्ट’चा मसुदा तयार केला होता. जॉर्ज बुश यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहांतून तो कायदा म्हणून मंजूर झाला होता. ‘जिओपॉलिटिक्स अँड एम्पायर’ला दिलेल्या मुलाखतीत डॉ. फ्रान्सिस यांनी कोरोनाबाबत सविस्तर चर्चा केली. ते म्हणाले, ‘वुहानमधील बीएसएल-4 लॅब म्हणजे केवळ चीनचे व्हायरॉलॉजी सेंटर नाही, तर ती जागतिक आरोग्य संघटनेचीही संशोधन शाळा आहे. अर्थात हे सेंटर म्हणजे एका अर्थाने चीन आणि जागतिक आरोग्य संघटना अशी दोघांची संयुक्त प्रयोगशाळा आहे. तिथे काय चालते, ते जागतिक आरोग्य संघटनेकडून लपलेले नसते.’ 


चीनने चोरला कॅनडातून कोरोना!


कोरोना विषाणूचे मटेरियल चीनने कॅनडातील प्रयोगशाळेतून चोरले, असा गौप्यस्फोटही डॉ. फ्रान्सिस यांनी केला आहे.


Popular posts
४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image
डॉ. वैभव लुंकड ( आरोग्यदूत ) सामाजिक कार्यकर्ते पुणे शहर यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी 
Image
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यात  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून अंतिम वर्षाच्या परीक्षा तयारीचा आढावा
Image
HIT DESIGN BACK IN STOCK 
Image