नेरळ मध्ये पोलिसांकडून रूट मार्च..  नागरिकांनी घरात राहावे-पोलिसांकडून आवाहन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


नेरळ मध्ये पोलिसांकडून रूट मार्च.. 

नागरिकांनी घरात राहावे-पोलिसांकडून आवाहन

कर्जत,ता.14 गणेश पवार

                कोरोना बाबत राज्य सरकारने लॉक डाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे जनतेच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,त्यामुळे नेरळ पोलिसांनी आज रूट मार्च करीत जनतेच्या मनात निर्माण झालेली भीती कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान,जनतेने घराबाहेर पडू नये आणि आहे त्या स्थितीत आपल्या घरात बसावे असे आवाहन नेरळ पोलिसांनी केले आहे.

                     कोरोना मुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रायगड जिल्हा हद्द असलेल्या बदलापूर पर्यँत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कर्जत तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.ही पार्श्वभूमी लक्षात नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील लोकांना आवाहन करण्यासाठी शक्ती प्रदर्शन करण्यात आले.कल्याण रस्त्यावरील जकात नाका येथून नेरळ पोलिसांनी रूट मार्च काढण्यात आला.त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांच्यसह नेरळ पोलीस ठाण्यात तीन पोलीस उपनिरीक्षक आणि 35 पोलीस कर्मचारी हे रूट मार्च मध्ये सहभागी झाले होते.त्याचवेळी पोलीस व्हॅन मधील ध्वनिक्षेपक यावरून जनतेला आवाहन करीत होते.यावेळी बोलताना नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक पाटील यांनी जनतेला घरातच राहण्याचे आवाहन केले. त्याचवेळी घरात बसून राहत असताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आणल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.नेरळ पोलिसांनी काढलेल्या रूट मार्च नेरळ बाजारपेठ येथून खांडा भागातून पुन्हा नेरळ पोलीस ठाणे येथे पोहचला.

Popular posts
शितल पेट्रोल पंप ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक(कमेला चौक) पर्यंतच्या मुख्य रोडवरील *रस्ता दुभाजक* साफ करून त्या ठिकाणी सुदंर असे रंगीबेरंगी फुलाचे रोपे लावण्याचे काम उद्यान विभागाकडून सुरू आहे.
Image
जय शिवसमर्थ पतसंस्थेच्या दिनदर्शीकेचे नगरसेवक विशाल धनवडे यांच्या हस्ते प्रकाशन.
अभिनेता - कलाकार  सागर वासुदेव भोगे यांना कोविड १९ कोरोना 2020 महायोद्धा -  (KOVID CORONA WARRIORS 2020 )  या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
Image
Fabric rayon Size M to xxl
Image
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली