अडकून पडलेल्या कामगार व मजुरांची* *निवास व भोजनाची व्यवस्था*           --डाॕ.दीपक म्हैसेकर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*अडकून पडलेल्या कामगार व मजुरांची*
*निवास व भोजनाची व्यवस्था*
          --डाॕ.दीपक म्हैसेकर
पुणे,दि.१७ -पुणे विभागात ठिकठिकाणी अडकून पडलेल्या परप्रांतीय कामगार , ऊसतोडणी कामगार व मजूरांसाठी विविध सामाजिक संस्था, साखर कारखाने व जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे माहिती विभागीय आयुक्त डाॕ.दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
     शासन, कम्युनिटी किचन व सामाजिक संस्थेचे किचन यांच्याद्वारे त्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे.शासनाकडून जेव्हा परवानगी मिळेल ,तो पर्यंत त्यांना सुरक्षित ठेवण्यात येईल.त्यांना काही अडचण असल्यास वेगवेगळ्या हेल्पलाईन सेवा सुरु केलेल्या आहेत. पुणे शहरात 30 व पिंपरी चिंचवड येथे 6 हॉट स्पॉट आहेत. जसे जसे रुग्ण आढळून येतील,तसे तसे  हॉट स्पॉट ठरविण्यात येतील व तेथे कर्फ्यु लावून वर्दळ कमी करण्यात येईल. 
   भाजीपाला, अन्नधान्य या जीवनावश्यक वस्तूंची सोय करण्यात येत आहे. तसेच ९५ टक्के  रेशनकार्ड धारकांना एप्रिल महिन्याचे अन्नधान्य वाटप करण्यात आले आहे. माहे मे व जून महिन्याचे वाटप  सुध्दा लवकर करण्याचा प्रयत्न आहे. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार केशरी रेशनकार्ड धारकांना सुद्धा अन्न- धान्य वाटप करण्यात येईल. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, अशांना कम्युनिटी किचन मध्ये जेवणाची सोय केलेली आहे. त्यामुळे त्यांना अडचण येणार नाही. तहसीलदार, महसूल अधिकारी, महानगरपालिका चे अधिकारी, पोलीस प्रशासन त्यांना मदत करेल, त्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
----------------------