पुणे प्रवाह न्युज पोर्टल
हा सुंगंध करतो पुरुषांना आकर्षित
~ ओरिफ्लेमने लाँच केला आकर्षित करणारा 'मॅग्नेटिस्टा फ्रॅगरन्स' ~
मुंबई, १५ एप्रिल २०२०: ओरिफ्लेम हा स्विडिश अग्रगण्य थेट विक्री करणारा सौंदर्य प्रसाधनांचा ब्रँड आगळा-वेगळा अनुभव देण्यासाठी पुरोगामी विज्ञानाचे पाठबळ असणारी उत्कृष्ट उत्पादने निर्माण करण्यावर विश्वास ठेवतो. या ब्रँडने नुकतेच मॅग्नेटिस्टा फ्रॅगरन्स हे दर्जेदार उत्पादन लाँच केले. हे वापरल्याने पुरुष महिलांकडे आकर्षित होतात हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे.
हा फ्रॅगरन्स अर्थात सुगंध एमिली कॉपरमॅन आणि अलीएनॉर मॅसेनेट या दोन तज्ञ परफ्यूमर्सनी डिझाइन केला आहे. या दोघांनी इंद्रियांवर उत्तेजक परिणाम करण्यासाठी ओळखल्या जाणा-या पॅशन फ्लॉवर अॅकॉर्डचा यासाठी वापर केला आहे. ओरिएंटल फ्लोरल फ्रॅगरन्सद्वारे डेव्ही नेरोली ब्लॉसम, पिंक पीपर, ब्लॅक करंट अशा ताज्या आणि सौम्य फुलांचा अनुभव मिळतो. तसेच ब्लूमिंग मस्क आणि व्हॅनिलाच्या उबदार आणि कामुक भावनांची अनुभूती येते.
ओरिफ्लेमचे साऊथ आशियातील रिजनल मार्केटिंगचे वरिष्ठ संचालक श्री नवीन आनंद म्हणाले, ‘ मॅग्नेटिस्टा हे पुरुषांना महिलांकडे आकर्षित करणारे, वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले पहिले उत्पादन आहे. हे उत्पादन पुरुषांना अत्यंत आकर्षक, सशक्त आणि नियंत्रणात ठेवणारे सिक्रेट प्रदान करते. हा मोहक सुगंध भावनांना उत्तेजन देतो, हे न्यूरोसायन्सद्वारे सिद्ध होते. तसेच याचा मेंदूवर सकारात्मक परिणाम होऊन आपल्या आकर्षणाची पातळी त्वरीत वाढते. हे एक प्रिमियम, अतिशय वेगळे, दीर्घकाळ प्रभावी, आधुनिक सुगंध देणारे उत्पादन असून आकर्षणाची शक्ती निर्माण करण्यासाठी हा महत्त्वाचा उपाय असू शकतो.”