पुणे प्रवाह न्युज पोर्टल
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट पुणे यांच्या वतीने २०० PPE किट आणि ४०० लिटर सॅनिटाइजर ससून हॉस्पिटलला सुपूर्त
०९ एप्रिल २०२०
पुणे: देशभरात कोरोना दिवसेंदिवस वाढतच जात आहे त्याच क्रमात पुणे देखील कोविड19 पॉझिटिव्हची संख्या आता 230च्या पार गेली आहे.या काळात सर्वात मोठी भूमिका पार पडणारे डॉक्टर्स स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या द्रुष्टीकोणातून श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट पुणे यांच्या वतीने स्वामी बॅग निर्मित 200 PPE किट तसेच सॅनिटाइजर ससून हॉस्पिटलच्या डॉक्टर, नर्सना आज सुपूर्त करण्यात आल्या.
या प्रसंगी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट चे युवराज गाडवे, शिरीष मोहिते, नंदकुमार सुतार, उल्हास कदम तसेच ससून हॉस्पिटलचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अक्षय शेटे, समाजसेवा अधिक्षक किरण कांबळे उपस्थित होते.