भारतीय दलित कोब्रा संघटनेची मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल -*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


भारतीय दलित कोब्रा संघटनेची मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल -*
 *पुणे :-* कोरोना या विषाणूचा वाढत्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील गरीब, फूटपाथवर व गरजू लोकांकडे रेशन कार्ड असो अथवा नसो सर्वाना सरकारने रेशन दुकानात अन्नधान्य द्यावे व ईतर मागण्यासाठी भारतीय दलित कोब्रा संघटनेचा वतीने अँड.वनिता चव्हाण (कायदेशीर सल्लागार भा.दलित कोब्रा )यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितल्यामुळे पुढील सुनावणी 30एप्रिल रोजी होणार आहे.सदर याचिका अँड.हर्षद बडबडे, अँड.मिलिंद पवार ,अँड.उमप , अँड.गायकवाड यांचा मार्फत दाखल करण्यात आली.