सक्षमपणे लढा देणा-या आरोग्य यंत्रणेचे माजी सैनिक संघटनेकडून अभिनंदन*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


Press release


 *सक्षमपणे लढा देणा-या आरोग्य यंत्रणेचे माजी सैनिक संघटनेकडून अभिनंदन*


पुणे:


शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, महाराष्ट राज्य या शासनमान्य संघटनेच्यावतीने व नवभारत मानवतावादी संस्थेच्यावतीने कोरोना संकटावर मात करण्यासाठी सक्षमपणे लढा देणा-या आरोग्य यंत्रणा व पोलिसयंत्रणेचा आरोग्यकिट व संघटनेचा कर्मयोगी विशेषांक देऊन अभिनंदन करण्यात आले.


डॉ अजय चंदनवाले, अधिष्ठाता व सहसंचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, डॉ. तावरे, वैद्यकीय अधिक्षक, ससून सर्वोपचार रुग्णालय, डॉ. समीर जोशी, प्राध्यापक व विभागप्रमुख कान नाक घसा विभाग, डॉ. कदम, डॉ. गायकवाड, डॉ. सांगळे, डॉ. बोरसे तसेच वे जी.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयातील नायडू हॉस्पीटल मध्ये कोरोना पेशंटवर उपचार करत असलेले डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी व स्वच्छता कर्मचा-यांना मास्क, सॅनिटायझर, हॅण्डवॉशचे वाटप करुन शुभेच्छा दिल्या.


यावेळी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष व विभागीय उपाध्यक्ष प्रकाश भिलारे, कोषाध्यक्ष निरंजन काकडे, अंबादास पालवे तसेच संघटनेचे पुणे जिल्हा पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


 नुकतेच  मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बोरसे यांच्याबरोबर    चर्चा केली होती व पेशंट बरे होत असल्याबददल कौतुक केले होते.


जगावर ओढावलेल्या कोरोनाव्हायरस विरोधातील युध्दजन्य स्थितीत माजी सैनिक स्वच्छने सेवा देण्यास तयार आहेत व तसे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. एकविसाव्या शतकातील ही लढाई शिस्तबध्द पध्दतीने वैद्यकीय तज्ञांच्या दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन केल्यास जिंकता येईल. त्यासाठी स्वयंशिस्त, स्वच्छता व संयमाने या विरुध्द प्रत्येकाने सैनिकासारखे लढण्याची आवश्यकता आहे, असे प्रकाश भिलारे यांनी सांगितले.


ही महाराष्ट्रातील राज्यस्तरीय पुनःर्नियुक्त माजी सैनिकांची शासनमान्य संघटना आहे. संघटनेने यापूर्वी पुरग्रस्तांना मदतकार्याबरोबरच मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये एक लाखाचा धनादेश दिला होता, शहीद जवानांचे कुटुंबिय व माजी सैनिकांच्या समस्यांवर उपाय योजना, शासनाच्या विविध उपक्रमामध्ये संघटना गत नऊ वर्षापासून कार्यरत आहे. 


................................................