महाराष्ट्र सरकारने राज्यातील जिल्ह्यांची विभागणी 🔴रेड,🟠ऑरेंज आणि 🟢ग्रीन अशा तीन झोनमध्ये केली आहे.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*महाराष्ट्र सरकारने राज्यातील जिल्ह्यांची विभागणी 🔴रेड,🟠ऑरेंज आणि 🟢ग्रीन अशा तीन झोनमध्ये केली आहे.
🔴कोरोनाचे १५ पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांचा समावेश *रेड झोन* मध्ये करण्यात आला आहे.
🟠१५ पेक्षा कमी रुग्ण संख्या असलेल्या जिल्ह्यांना *ऑरेंज झोन* मध्ये ठेवण्यात आले आहे.
🟢एकही रुग्ण नसलेल्या जिल्ह्याचा समावेश *ग्रीन झोन* मध्ये करण्यात आला आहे.


🔴 *रेड झोन जिल्हे* : मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड,नागपूर, औरंगाबाद, सांगलीचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे.


🟠 *ऑरेंज झोन जिल्हे* : कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड,जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा,वाशिम, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज झोनमध्ये ठेवण्यात आले आहे.


🟢 *ग्रीन झोन जिल्हे* : नांदेड, चंद्रपूर,भंडारा, गडचिरोली, धुळे, नंदुरबार, सोलापूर, वर्धा, परभणीचा समावेश आहे.


🔴 *रेड झोनमध्ये असेल तर...*
ज्या जिल्ह्यांना रेड झोन जाहीर करण्यात आले त्या सर्व जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन आता सुरुच राहणार असून, तेथील निर्बंध आणखी कठोर केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
🟠 *ऑरेंज झोन असेल तर....*
ऑरेंज झोनमधील जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील. तिथले निर्बध काही प्रमाणात शिथिल करण्यात येतील.


🟢 *ग्रीन झोन असेल तर...*
ग्रीन झोनमधील जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा मिळणार आहे.कारण अशा जिल्ह्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवले जाणार आहेत.त्यामुळे या जिल्ह्यांतील जनजीवन पूर्वपदावर येणार आहे.


संदर्भ: ई सकाळ न्युज लिंक 👁️‍🗨️
https://www.esakal.com/coronavirus-maharashtra/maharashtra-government-declared-three-zones-lock-down-purpose-279650