पुण्यातील अंगणवाडी सेविकेची कोरोनावर यशस्वी मात

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


5)  पुण्यातील अंगणवाडी सेविकेची कोरोनावर यशस्वी मात
__________________________________


पुणे जिल्ह्यात अंगणवाडी सेविका म्हणून काम करणाऱ्या ४१ वर्षीय महिलेने कोरोनावर मात केली असून इच्छाशक्तीच्या जोरावर तिने या आजाराला पराभूत केले आहे. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले असून, पूर्णपणे बऱ्या झालेल्या या महिलेला बुधवारी घरी सोडण्यात येणार आहे. या महिलेचे वय आणि मूळ प्रकृती धडधाकट असणे यामुळे ती व्हेंटिलेटरवर (कृत्रिम श्वासोच्छवास यंत्रणा) असूनही ठणठणीत बरी झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
ही महिला कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्यानंतर ग्रामीण भागात काळजीचे वातावरण निर्माण झाले होते.  दरम्यान, एका  हॉस्पिटलमध्ये या महिलेला दाखल करण्यात आले होते. या महिलेवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू केले होते. महापालिकेचा आरोग्य विभागही या रुग्णावर लक्ष ठेवून होता. चौदा दिवसांनंतर केल्या जाणाऱ्या तपासणीचे अहवाल सोमवारी निगेटिव्ह आले. त्यांची दुसरी तपासणी मंगळवारी करण्यात आली असून, त्याचे अहवाल येणे बाकी आहे.
दरम्यान, संबंधित हॉस्पिटलचे अधिष्ठाता आणि त्यांच्या टीमला पालिका आयुक्तांनी बोलावून घेत उपचारांची आणि उपाययोजनांची माहिती घेतली. या महिलेची दुसरी चाचणीही निगेटिव्ह येईल, अशी आशा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली.


रूग्णाला पोटावर झोपवून केले व्हेंटिलेशन -


कोरोनाबाधित महिलेला व्हेंटिलेटरवरून मंगळवारी सकाळी काढले आहे. जवळपास दहा दिवसांनंतर ती आयसीयूमधून बाहेर आली आहे. ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शासनाच्या नियमावलीप्रमाणे उपचार देण्यास सुरुवात केली. महिलेला न्युमोनिया झाला होता. ही पहिलीच केस असल्याने थोडी भीती होती. पण आम्ही हे आव्हान स्वीकारले. न्युमोनियामुळे तिला पोटावर झोपवून व्हेंटिलेशन केले. सहसा रुग्णाला व्हेंटिलेशन करताना पाठीवर झोपविले जाते. महिलेला सहा तास सरळ, सहा तास पोटावर असे झोपविले जात होते. मग हळूहळू ती यातून बाहेर येत गेली. त्यामुळे दोन दिवसांपासून औषधे कमी करण्यास सुरुवात केली. सोमवारी ती हळूहळू बोलू लागली. आता ती कोरोनामधून बाहेर आली आहे. पण दहा दिवस व्हेंटिलेटरवर असल्याने शरीर कमजोर झाले आहे. त्यामुळे आणखी काही दिवस रुग्णालयात ठेवावे लागणार आहे.


- डॉ. संजय ललवाणी, वैद्यकीय तज्ज्ञ


Popular posts
४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यात  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून अंतिम वर्षाच्या परीक्षा तयारीचा आढावा
Image
HIT DESIGN BACK IN STOCK 
Image
मा. श्री. किशोर शितोळे यांना पुणे प्रवाह कोविड-१९ महायोद्धा2020 PUNE PRAVAH Covid-19 WARRIORS 2020 पुरस्काराचे मानकरी 
Image