कोरोना संसर्ग: व्यक्ती किंवा समुहावर होणारी जंतुनाशक फवारणी ठरू शकते अपायकारक

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*कोरोना संसर्ग: व्यक्ती किंवा समुहावर होणारी जंतुनाशक फवारणी ठरू शकते अपायकारक*
*सॅनिटेशन डोम अथवा टनेलचा वापर न करण्याच्या सूचना*
मुंबई, दि. १९: कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्यात ठिकठिकाणी निर्जुंतकीरणासाठी व्यक्ती किंवा समुहाच्या अंगावर रसायनांची फवारणी करण्यासाठी डोम, अथवा टनेल यांचा वापर केला जात आहे. मात्र त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. या रसायनामुळे व्यक्तीला अपाय होऊ शकतो म्हणून  फवारणीसाठी टनेल किंवा डोमचा वापर करू नये अशी सूचना केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने सर्व राज्यांना केली आहे.
 त्यानुसार आज सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी, महापालिका आरोग्य अधिकारी यांना पत्र पाठवून राज्यात या प्रकारच्या यंत्रणांचा वापर न करण्याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने कळविले आहे.
राज्यात अनेक ठिकाणी सॅनिटेशन डोम किंवा टनेलचा वापर होत असून त्याद्वारे व्यक्ती किंवा समुहावर वापर केला जात आहे. यासाठी वापरले जाणारी रसायने मानवी आरोग्यासाठी अपायकारक असून अशा फवारणीमुळे कोरोना जंतुसंसर्ग रोखला जातो याला शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे राज्यात अशा फवारणी यंत्रांचा वापर न करण्याच्या सूचना आरोग्य संचालक डॉ. अर्चना आटील यांनी पत्राद्वारे दिल्या आहेत.
अजय जाधव..१९.४.२०२०


Popular posts
शिवपुत्र राजाराम महाराज 🚩"  शिवाजी महाराजांच्या  तृतीय पत्नी राणी सोयराबाई यांच्या पोटी 24 फेब्रुवारी 16 70 रोजी राजाराम महाराजांचा जन्म झाला .
Image
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
ज्ञानदाइन्स्टिट्यूट ऑफ फ्लो पायपिंग टेक्नॉलॉजी द्वारे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध
२७ फेंबुवारी मराठी भाषा दिन* जाणतो मराठी .......मानतो मराठी ; जागतिक मराठी दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image