कोलाहलात सा-या* . .  *माणूस शोधतो मी* !

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*कोलाहलात सा-या* . . 
*माणूस शोधतो मी* !
🌝🌝🤔😓😊
   माणूस वाचणे, समजून घेणे, ही बाब, तशी सहज सुलभ आंणि अनेकदा अवघड सुद्धा  ! 
    सद्यःस्थितीत, अनेकांचा कोंडमारा होत असताना, जगण्याची लढाई सुद्धा जटील होत आहे. स्वाभिमानाची ज्योत तेवती ठेवणे, वादळी स्थितीत, कठीण होत आहे. 
    दत्त मंदीर येथे विद्यार्थ्यांसाठी सध्या चालू असलेल्या अन्नछत्रामधे सहभागी होताना,मी  मनुष्य स्वभावाची विवीधता, रोज अनुभवतो आहे. या वयोवृद्ध महिलेचा  परीचय इथेच झाला.
      कसब्यातील एका चाळीत, जेमतेम एक खणाच्या खोलीत, आजीबाई रहातात. दोन्ही हात सक्षम नाहीत परंतू मन मात्र खंबीर आहे. उत्सुकतेपोटी, त्यांच्या घरी सहकुटुंब भेट दिली. कुसुमाग्रजांच्या *कणा* कवितेतील वाटावे, असेच खंबीर  व्यक्तीमत्व ! आम्ही बरोबर नेलेला खाऊ देऊन, नमस्कार केला त्या बरोबर, चिमूटभर साखर आंणि भरभरून आशिर्वादाचा हात, आमच्या पाठीवर विसावला .
  दत्त मंदीराच्या रांगेत उभ्या असलेल्यांना अन्नदान करताना, काहींना नाईलाजाने नाकारताना, माणूस जपताना, पाडगावकर आठवतात  . . .
गर्दीत माणसांच्या, 
  माणूस शोधतो मी ,कोलाहलात सा-या, 
माणूस शोधतो मी  ! 
हे धर्म देवळे मी, धुंडून सर्व आलो  ! 
भिंतीपल्याड त्यांच्या, माणूस शोधतो मी  . . . . 
    *आनंद सराफ*