आझम कॅम्पस तर्फे लोहिया नगर येथे शंभर 'किराणा किट' चे वितरण* 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रेस नोट
*आझम कॅम्पस तर्फे लोहिया नगर येथे शंभर 'किराणा किट' चे वितरण*
पुणे :
 आझम कॅम्पस मधील हाजी गुलाम महंमद आझम एज्युकेशन ट्रस्ट च्या वतीने कोरोना साथीच्या आणि लॉक डाऊन मुळे अडचणीत असलेल्या  लोहिया नगर येथील  शंभर गरजुंना किराणा सामान आणि जीवनोपयोगी वस्तूंच्या किट चे वाटप करण्यात आले. सोमवारी झालेल्या या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक गणेश माने,सामाजिक कार्यकर्ते एस.बी .एच. इनामदार,अरिफ सय्यद,माजी नगरसेवक युसूफ शेख,साजिद शेख ,कॉन्स्टेबल तेजस पांडे,झुबेर शेख ,इम्रान शेख ,अलाउद्दीन शेख ,समीर शेख  यांच्या हस्ते किट चे वितरण करण्यात आले. 
 याआधी २५ लाखाचे अन्नधान्य पहिल्या टप्प्यात आझम कॅम्पस येथे झालेल्या कार्यक्रमात वितरित करण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात पुण्याच्या विविध भागात सर्व धर्मीय गरजू नागरिकांना मदत पुरवली जात आहे,अशी माहिती  आझम कॅम्पस मधील हाजी गुलाम महंमद आझम एज्युकेशन ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी दिली . 
---------------------------------