तांदळा' सोबत 'गहू' सुद्धा मिळायला पाहिजे.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


'तांदळा' सोबत 'गहू' सुद्धा मिळायला पाहिजे...! 


"केंद्र सरकार प्रत्येक कुटुंबाला पाच किलो तांदूळ मोफत देणार आहे. महाराष्ट्राचा आहार संमिश्र आहे. आम्ही ज्वारी - गहू खाणारी माणसं तांदळाची काय फक्त 'इडली' करून खायची का...! रेशन दुकानावर ५ किलो तांदळा सोबत १० किलो 'गहू' सुद्धा मिळाले पाहिजेत." 


केंद्र सरकार व पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी'जी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांनी विचार करायला हवा...


पुण्यात परिस्थिती गंभीर आहे. कर्फ्यु वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे काळजी येणाऱ्या प्रत्येक माणसाला जगण्यासाठी अन्नधान्याची गरज आहे. काम धंदा बंद असल्यामुळे कामगार, कष्टकरी, शेतकरी, विद्यार्थी व सामान्य माणसाचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे रेशन दुकानावर सरसगट सर्वांना ५ किलो 'तांदळा' बरोबर १० किलो 'गहू' सुद्धा मिळाले पाहिजेत.


तसेच, पुणे शहरातील सील केलेल्या परिसरात व ज्या भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत अशा भागात Rapid Random Test घेण्याबाबत व ड्रोन Camera द्वारे परिसरावर लक्ष ठेवावे... ही नम्र विनंती. 


(रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करावी, विनाकारण फिरणाऱ्यांना तात्काळ स्थानबद्ध करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. म्हणून लोकसंख्येचा विचार करता... ड्रोन Camera ची पुण्याला प्रचंड आवश्यकता आहे.)


पुण्यासह महाराष्ट्राचा आहार वेगळा आहे. तांदळाची इडली न करता 'भात' करून आणि गव्हाची 'चपाती' करून माणसाला जगता येईल याचा विचार करावा. कदाचित महाराष्ट्रातील संचारबंदी किती होईल परंतु पुणे जिल्ह्यातील संचारबंदी शेतीतील होण्यास उशीर ला लागेल त्यामुळे सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होतील ही विशेष नम्र विनंती... 


(कृपया महत्त्वाचे...)



प्रति,
मा. पंतप्रधान, भारत सरकार.
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.


 - संतोष शिंदे,
जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, पुणे.
9850842703


https://m.facebook.com/story.php?story_fbid=3159382294080475&id=693099604042102