कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 लाख 19 हजार मजूरांना भोजन पुणे विभागात 664 रीलीफ कॅम्प*                                                          -विभागीय आयुक्त

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 लाख 19 हजार मजूरांना भोजन पुणे विभागात 664 रीलीफ कॅम्प*
                                                         -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
पुणे, दि. 3: पुणे विभागात स्थलांतरीत मजुरांसाठी प्रशासनातर्फे 106 तर साखर कारखान्यामार्फत 558 कॅम्प सुरु करण्यात आले असून यामध्ये एक लाख 19 हजार 273 मजूरांच्या भोजनाची सोय करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
              डॉ. म्हैसेकर म्हणाले, विविध क्षेत्रात काम करणारे वेगवेगळ्या क्षेत्रातील कामगार आपल्या राज्यांमध्ये आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या सूचनांप्रमाणे त्यांना आहे तेथेच ठेवायचे आहेत. त्यादृष्टीने आपण पुणे विभागामध्ये त्यांच्यासाठी वेगळे खास कॅम्पस उघडलेले आहेत. त्या कॅम्पसमध्ये त्यांना जेवणाची सोय केलेली आहे. विविध उद्योग क्षेत्रात काम करणारे इतर राज्यातील कामगार पुणे विभागात आहेत. परराज्यातील कामगारांची राहण्याची व जेवणाची सोय प्रशासनामार्फत करण्यात आली आहे.
        पुणे विभागात एकूण 664 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत, यामध्ये एकूण 60 हजार 793 स्थलांतरीत मजूर व 1 लाख 19 हजार 273 मजूरांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.  त्याठिकाणी वीजपुरवठा, पाण्याची व शौचालयाच्या अनुषंगाने दक्षता घेण्यात आली आहे.
                                                           0000