शिवराय मनामनात... शिवजयंती घराघरात...* *घरोघरी शिवजयंती स्पर्धा...🚩

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*शिवराय मनामनात... शिवजयंती घराघरात...*


*घरोघरी शिवजयंती स्पर्धा...🚩*


छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात व जगभरात साजरी झाली. संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुण्यात *'घरोघरी शिवजयंती महोत्सव स्पर्धा...'* आयोजित करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज हे परत शिवजयंतीच्या निमित्ताने घराघरापर्यंत पोचतील. प्रत्येक घरात त्यांचे स्मरण होईल, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा, कार्याचा व पराक्रमाचा जागर होईल आणि समाजात समता, समानता आणि बंधुता प्रस्थापित होईल... हा या शिवजयंती उत्सवा मागचा उद्देश आहे. *'शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही संरक्षण देणारे छत्रपती शिवाजी महाराज...* आज असते तर, सर्व समाज गुण्यागोविंदाने जडला असता. महिला सुरक्षित असत्या. शिवरायांनी शत्रूच्या ही स्त्रीचा सन्मान केला ती शिवरायांची शिकवण आपण आज आत्मसात केली पाहिजे होती. आज कुठलीही स्त्री सुरक्षित नाही, समाज सुरक्षित नाही. धर्माच्या नावाने आणि जातीच्या द्वेषाने समाज पोखरला गेलेला आहे. परंतु आपण *जय जिजाऊ... जय शिवराय...!!* ही घोषणा देऊन सर्व जाती धर्मांना एकत्र करून भारतीय संविधान व त्याची सार्वभौमत्वता अजून मजबूत करू या.


*'घरोघरी शिवजयंती स्पर्धेत...* सौ. स्वाती भापकर व मा. वसंतराव भापकर, धनकवडी यांचा सहकुटुंब परिवाराचा ? *'छत्रपती शिवाजी महाराजांची'* प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्या कुटुंबातील सून व नातवंडे सह सर्वजण शिव विचारांनी प्रेरित होते. जिजाऊंची शिकवण, संस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम व समाजशीलता हा भारतीय समाज मनाचा अंग आहे. तोच धागा पकडून संभाजी ब्रिगेड *'शिवचरित्र'* घराघरात पोहोचवेल याचा या माध्यमातून संकल्प करत आहे.


*घरोघरी शिवजयंती* स्पर्धेचा सन्मान करताना यावेळी... संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, सचिव महादेव मातेरे, भोरर तालुकाध्यक्ष गणेश चऱ्हाटे, वाहतूक आघाडीच्या अध्यक्ष राहुल टेंगळे, मयुर शिळीमकर व भापकर परिवार उपस्थित होता.


जय जिजाऊ...! जय शिवराय...!!


- संतोष शिंदे, 
जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, पुणे.
*दक्षिण पुणे शिवमहोत्सव समिती, पुणे.*