कचरा समस्येला कंटाळुन गोखलेनगर, जनवाडी, जनतावसाहत भागातील तरुण झाडू घेऊन उतरले रस्त्यावर

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


विषय : कचरा समस्येला कंटाळुन गोखलेनगर, जनवाडी, जनतावसाहत भागातील तरुण झाडू घेऊन उतरले रस्त्यावर


गोखलेनगर, जनवाडी, जनता वसाहत भागामध्ये दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या वाढत चालली आहे. वाढत चाललेल्या आरोग्याच्या समस्या आणि अस्वच्छता यामुळे नागरिक हैराण झाले होते. त्यामुळे दिनांक १/३/२०२० रोजी प्रविण दत्तु डोंगरे यांच्या संकल्पनेतुन प्रभागातील सर्व युवा तरुण एकवटून जनवाडी चौक ते कुसाळकर पुतळा चौक पर्यंत शिवसेना व  स्व. दत्तु डोंगरे महाराज फॉउंडेशनच्या  संयुक्त विद्यमानाने स्वच्छता मोहीम घेण्यात आली . 
या स्वच्छता मोहिमे अंतर्गत तरुणांनी जनवाडी संपुर्ण भाजी मार्केटचा  परिसर स्वच्छ केला तसेच ह्युंडाई शोरूम समोरील कचरा जो अनेक वर्ष पडत होता तो परिसर देखील कचरा मुक्त केला. 
प्रविण डोंगरे  यांनी हाती घेतलेल्या कचरामुक्त गोखलेनगर मोहिमेमध्ये युवकांसोबतच तृतीयपंथी, भागातील नागरीक तसेच स्वच्छता कामगारांनी सहभाग घेतला. 
जो पर्यंत संपुर्ण परीसर हा कचरामुक्त होणार नाही तोपर्यंत प्रत्येक रविवारी हा उपक्रम राबविला जाणार आहे असे मनोगत प्रविण डोंगरे यांनी व्यक्त केले. 
सदर उपक्रमात राजन नायर, संतोष ओरसे, मयुर पवार, राजु धोत्रे, सुरज कुसाळकर, राहुल धोत्रे, निखिल ओरसे, श्याम धोत्रे, रोहित कुसाळकर, प्रशांत डोंगरे, संजय कुसाळकर इत्यादी उपस्थित होते.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*