पोस्टमार्टम रात्री का केले जात नाही?* 

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*पोस्टमार्टम रात्री का केले जात नाही?* 
जाणून घ्या या मागील कारणे तुम्ही होणारे डॉक्टर किंवा nurse , फॉरेन्सिक किंवा CID  विभागाचे असाल तर तुम्हाला शव-विच्छेदनाबद्दल नक्की च माहिती करून घ्यायला आवडेल परंतु सर्वसामान्य लोक न्यायालय, पोलीस-स्टेशन , प्रेतागार  आदी गोष्टींपासून चार हात दूर राहू इच्छितात . आणि त्यात गैर असं काही नाही पण तरीही काही गोष्टींची माहिती सर्वसामान्य असूनही आपल्याला माहित असणं  अतिशय जरुरी आहे . तुम्हाला माहिती आहे की  कुठल्याही प्रेताच विच्छेदन हे ती व्यक्ती गेल्याच्या ६ ते १० तासातच करावं  लागतं कारण व्यक्ती जात क्षणीच त्याच्या मृत देहात त्वरित बदल होऊ लागतात . त्याच्या डोळ्यांचा रंग बदलून "हिरवा " होतो ( याच कारणामुळे , horror  stories मध्ये भुतांचे डोळे "हिरवे " दाखवतात ) , शरीर लाकडाप्रमाणे कडक होऊ लागतो . कुठल्या दुर्धर आजाराने किंवा अपघाताने मरण आलं असेल तर बॅक्टरीया वाढून तो पसरण्याची शक्यता असते . पण असे असूनही " रात्रीच्या वेळी शव-विच्छेदन केलं  जात नाही ". एक तर मृत्यू संशयित असेल तरच " शव -विच्छेदनाची " मागणी केली जाते . पण रात्री अंधारात किंवा ट्यूब -लाईट. च्या कृत्रिम प्रकाशात , शरीरावरील जखमांचा नैसर्गिक लाल रंग दिसण्याऐवजी तो "जांभळा " दिसतो . आणि "फॉरेन्सिक सायन्स " मध्ये जांभळ्या जखमा असा प्रकार नसल्याने गुन्ह्याच्या तपासाची दिशाभूल होऊ शकते . आणि ती होऊ नये म्हणूनच शव-विच्छेदन रात्री केली जात नाही .


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*