विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी घेतला रक्तपेढयातील रक्तसाठा स्थितीचा आढावा*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी घेतला रक्तपेढयातील रक्तसाठा स्थितीचा आढावा*
पुणे दि. 21: कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने पुण्यातील रक्तपेढयामध्ये सद्यस्थितीतील रक्तसाठयांचा आढावा घेऊन  केंद्र व  राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच यासंदर्भातील सामाजिक शिष्टाचारानुसार रक्तसाठा वाढवावा अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिल्या.
  विभागीय आयुकत कार्यालयाच्या सभागृहात डॉ. म्हैसेकर यांनी पुण्यातील रक्तपेढयांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित होते.  
 आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, आपल्याकडील गरज लक्षात घेता नेहमीपेक्षा आपल्याकडे किती रक्तसाठयाची गरज आहे, ही गरत लक्षात घेत आपल्याकडे रक्तसाठा असणे आवश्यक आहे, त्यादृष्टीने सामाजिक शिष्टाचार विचारात घेवून रक्तसाठा वाढवावा, रक्तदात्यांची यादी तयार करून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना व रक्तदात्याचा इतिहास व वैद्यकीय तपासणी करूनच रक्तदानाची प्रक्रिया पुर्ण करावी, यामध्ये कार्यरत असलेल्या काही स्वंयसेवी संस्थाची याकामी मदत घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.  केंद्र व  राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच यासंदर्भातील सामाजिक शिष्टाचारानुसार रक्तसाठा वाढविण्यात येईल तसेच वेळोवेळी असलेल्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे रक्तपेढयांच्या प्रतिनिधींनी मान्य केले.
                                              0000


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com


मेलवर पाठविणे बंधनकारक*