भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी स्थापन केलेल्या " आझाद समाज पार्टी " या  नवीन पक्षात पुण्यातील अभिजित गायकवाड व अशोक कांबळे  यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भव्य जाहीर प्रवेश

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी स्थापन केलेल्या


" आझाद समाज पार्टी " या  नवीन पक्षात पुण्यातील अभिजित गायकवाड व अशोक कांबळे  यांनी


आपल्या असंख्य समर्थकांसह भव्य जाहीर प्रवेश


 


भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी स्थापन केलेल्या " आझाद समाज पार्टी " या  नवीन पक्षात पुण्यातील अभिजित गायकवाड व अशोक कांबळे  यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भव्य जाहीर प्रवेश केला . भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी आपल्या आझाद समाज पार्टी या  नवीन पक्षात पक्षाचा ध्वज देउन प्रवेश दिला .


या नव्या पक्षात २८ माजी आमदार व ६ माजी खासदार यांनी या नव्या पक्षात प्रवेश केला आहे . पक्षाच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला विविध राज्यातून आलेले भीम आर्मीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . या प्रवेशामध्ये रवी वडमारे , राजू वाघमारे , अजित गायकवाड , अंकित गायकवाड व असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला .


महाराष्ट्रात  " आझाद समाज पार्टी " या  नवीन पक्षाला बळकट करण्याचे काम करणार , युवक युवतींना पक्षामध्ये काम करण्याची संधी देणार . सर्व समाजाला बरोबर घेउन काम करणार , पक्षाची नवीन सभासद नोंदणी सुरु करणार असून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार , अशी माहिती अभिजित गायकवाड यांनी दिले .