कोरोना':  गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आवाहन*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*'कोरोना':  गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आवाहन*


पुणे,दि.१५: कोरोना विषाणूचा प्रसार होवू नये, यासाठी बाधित देशांतून प्रवास करुन आलेल्या तसेच परदेशात प्रवास करुन आलेल्या काही नागरिकांना आपापल्या घरी अलगीकरण करुन ठेवण्यात आले आहे. या नागरिकांना त्यांच्या सोसायटीतील (गृहनिर्माण संस्था) नागरिक, सोसायटीचे चेअरमन, सचिव व सदस्य यांनी  विनाकारण त्रास देवू नये, अथवा बहिष्कार टाकू नये. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी तथा पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहेत. 


    चीन, भारत, इटली, दक्षिण कोरिया, श्रीलंका, नेपाळ, जपान, थायलंड, दुबई, अमेरिका, फ्रान्स, इराण, सिंगापूर, मलेशिया, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, स्पेन, डेन्मार्क, पाकिस्तान इत्यादी देशांमध्ये या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात कोरोना या विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. जागतिक आरोग्य संस्थेने या आजारास जागतिक आणीबाणी घोषित केले आहे. 


कोरोना विषाणूची लक्षणे मुख्यतः श्वसनसंस्थेशी निगडित आहेत. सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, निमोनिया, काही वेळा मूत्रपिंड निकामी होणे, अशी मुख्यत्वेकरुन लक्षणे आहेत. 


    कोरोना बाधित देशांतून प्रवास करुन आलेल्या नागरिकांचे स्क्रिनिंग मुंबई, पुण्यासह देशातील २१ विमानतळांवर सुरु करण्यात आले आहे. या स्क्रिनिंग मध्ये आढळलेल्या संशयित रुग्णांना विलगीकरण कक्षामध्ये भरती करण्याची सुविधा पुण्यातील नायडू रुग्णालय व पिंपरी चिंचवड मधील वाय.सी.एम. रुग्णालयात करण्यात आली आहे. विदेशातून प्रवास करुन भारतात दाखल झालेल्या व्यक्ती त्यांच्या घरात अलगीकरण कक्षामध्ये राहत आहेत. या व्यक्ती त्यांच्या घरात राहिल्यामुळे सोसायटी मधील इतर कुटुंबियांना संसर्ग होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेशात म्हटले आहे.


      00000


Popular posts
७१ व्या गणतंत्र - प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिन चिरायू व्होवो जय भारत ...जय महाराष्ट्र...... जयहिंद.
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
कोरोना बाधित रुग्णांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात सुविधा-अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले 
Image
शांताराम कुंजीर म्हणजे लढवय्या,निर्भीड, संघर्षशील नेता!*          *भावपूर्ण श्रद्धांजली* :- श्रीमंत कोकाटे
Image
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image