लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे शिल्प व सुशोभीकरणासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करावी - रिपब्लिकन पक्षाची मागणी*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कृपया प्रसिध्दी साठी
*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे शिल्प व सुशोभीकरणासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करावी - रिपब्लिकन पक्षाची मागणी* 
   पुणे :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व मातंग संघटनांच्या वतीने पुणे महानगर पालिकेच्या सहाय्यक आयुक्त ( पथ विभाग ) व्हि.जे. कुलकर्णी यांची भेट घेवून प्रभाग क्रमांक ३५ येथील तावरे कॉलनी व अरण्येश्वर चौकस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक असे नामकरण करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाला उजाळा देणारे शिल्प व सुशोभीकरणासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली 
  सन २०१२  रोजी पुणे महानगर पालिकेच्या नाव समितीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक असे नामकरण करण्याचा ठराव मंजूर झाला असताना देखील त्या ठिकाणी नामफलकचा फलक लावण्यात आला नाही सन २०२० हे वर्ष लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे त्यामुळे पुणे महानगरपालिकेचे महापौर , उपमहापौर , स्थायी समिती अध्यक्ष व स्थानिक नगरसेवक यांनी पुढाकार घेऊन हे काम त्वरित करावे ब ५० लाख रुपयांची तरतूद करावी 
यावेळी नगरसेविका वर्षा तापकीर रिपब्लिकन पक्षाचे माजी शहराध्यक्ष महेंद्र कांबळे,  विनोद शिंदे,  राहुल खुडे , अमित शिंदे, सचिन जोगदंड , विशाल साळवे , रमेश तेलवडे ,  सुधाकर राऊत, अतुल भालेराव,सदानंद कडलक,विक्रम आल्हाट, रमेश कांबळे, अमोल साठे ,नामदेव घोरपडे,  नामदेव भवाळे, लक्ष्मण म्हस्के, राजू दोडके इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते