विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची नायडू रुग्णालयास भेट*  कोरोना बाबत उपाययोजना व     उपचारांचा घेतलाआढावा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची नायडू रुग्णालयास भेट*  कोरोना बाबत उपाययोजना व     उपचारांचा घेतलाआढावा 
पुणे दि.६: विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे महानगरपालिकेच्या नायडू संसर्गजन्य रुग्णालयास भेट देऊन कोरोना बाबत उपाययोजना आणि तेथील उपचारांचा आढावा घेतला.
  सध्या नायडू रुग्णालयात ६बेड चा विलगीकरण कक्ष करोना आजाराच्या संशयितांच्या तपासणीकरिता सुरू करण्यात आला आहे. विभागीय आयुक्तांनी या कक्षास भेट देऊन येथील खबरदारीचे उपाय आणि उपचारांची माहिती घेतली . यावेळी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले,उप अधिष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे,आरोग्य उपसंचालक डॉ.एस.ए. देशमुख,पुणे महानगरपालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ.रामचंद्र हंकारे,डॉ. संजीव वावरे ,नायडू रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.सुधीर पाठसूत आदी उपस्थित होते.
   करोना बाबत नागरिकांनी घाबरून न जाता स्वच्छतेवर अधिक भर द्यावा.गर्दी असणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन टाळावे .शहरात करोनाचा एकही रुग्ण पॉजीटीव्ह आढळलेला नसला तरी आरोग्य यंत्रणा सुसज्ज असल्याचे डॉ.म्हैसेकर यांनी यावेळी सांगितले.वैद्यकीय अधिकारी, परिचारिका,परिचारक यांना करोनाबाबत विशेष प्रशिक्षण दिले आहे. विलगीकरण कक्षातील संशयीत रुग्ण संपूर्ण देखरेखीखाली आहेत.आजवर नायडू रुग्णालयात एकही करोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही.यावेळी अधिक बेड ची गरज भासल्यास खाजगी रुग्णालयांशीही संपर्क करून अत्यावश्यक आरोग्य सुविधा व उपचार उपलब्ध करण्याबाबत विभागीय आयुक्तांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.


Popular posts
७१ व्या गणतंत्र - प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिन चिरायू व्होवो जय भारत ...जय महाराष्ट्र...... जयहिंद.
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
कोरोना बाधित रुग्णांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात सुविधा-अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले 
Image
शांताराम कुंजीर म्हणजे लढवय्या,निर्भीड, संघर्षशील नेता!*          *भावपूर्ण श्रद्धांजली* :- श्रीमंत कोकाटे
Image
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image