*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*आदिवासी पाड्यातील दिंडोरी येथील आमदार श्री नरहरी झिरवाळ यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन*
*नाशिक :-* तहसील कार्यालयात क्लार्क, पण तिथंही रमू न लागल्याने नाशिकला जाऊन बिगारीच काम केलं परत गावाकडे जाऊन शेती आणि शेतीसोबत तत्कालीन खा.महाले यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात काम करू लागले, १५ वर्षे सरपंच, पंचायत समिती सदस्य, सभापती पुढे जाऊन २००४ ला आमदार, आता तिसऱ्यांदा विधानसभेत आलेत..
साधा पायजमा पेहराव, डोक्यावर टोपी आणि ग्रामीण बाज बोलीभाषा अशी सर्वसाधारण ओळख. शेतात बांधावर तर कधी आदीवासी बांधवांसोबत त्यांचे फोटो दिसून येतात. ते उत्तम किर्तनही करतात अस ऐकलंय.
झिरवाळ साहेबांनी राजकारणात येण्यापूर्वी तमाशा मध्ये पण काही काळ काम केलंय. त्यानी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त वळण पाणी योजना या दिंडोरी पेठ तालुक्यात आणून शेतीचा विकास केला आहे. जिथे कॅनॉलचे पाणी नाही दुर्गम आदिवासी भागात तिथे पाझर तलावांचे काम केलेय, जलसंपदा विभागविषयी प्रचंड अभ्यास आहे हे विशेष. प्रचंड जनसंपर्क आणि ३ वेळेचे आमदार असूनही कोणताही बडेजाव त्यांच्याकडून दिसून येत नाही...
सर्वसामान्य माणसातून प्रचंड संघर्ष करत इथंवर आलेल्या *आदिवासी पाड्यातील दिंडोरी येथील आमदार श्री नरहरी झिरवाळ यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन*.....💐