जागतिक महिला दिना निमित्त......'*  *शेकडो महिलांचा पुण्यात  'संभाजी ब्रिगेड' मध्ये जाहीर प्रवेश...🚩*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*संभाजी ब्रिगेड, पुणे...🚩*


*'जागतिक महिला दिना निमित्त......'* 
*शेकडो महिलांचा पुण्यात  'संभाजी ब्रिगेड' मध्ये जाहीर प्रवेश...🚩*


*प्रत्येक महिलांचा सर्वोच्च सन्मान आणि संरक्षण हीच शिवरायांची खरी शिकवण आहे* - संभाजी ब्रिगेड


आज आपल्या देशात महिला सुरक्षित नाहीत. सध्या राजकीय क्रांती शिवाय पर्याय नाही. आपण 'जिजाऊ शिवरायांचा' आदर्श डोळ्यांसमोर ठेवलाच पाहिजे. प्रत्येक महिलांचा सर्वोच्च आदर, सन्मान आणि संरक्षण हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, ती आपण पाळली पाहिजे. सध्या दररोज अन्याय-अत्याचाराच्या भयानक घटना घडत आहेत. परिवर्तनाची भाषा बोलणाऱ्या महाराष्ट्रात 'महिलांना जिवंत जाळलं जातं' ही घटना संतापजनक आहेत. हा महाराष्ट्र महापुरूषांचा आणि साधुसंताचा आहे. संघर्षातून त्यांनी महाराष्ट्र घडवला. मात्र त्याचे विचार लोकांनी आत्मसात केले नाहीत. यापुढे महापुरुषांच्या विचारांचा जागर करून सर्वांना सन्मानाची वागणूक आणि समान संधी दिली पाहिजे... तरच कुटुंबाची, समाजाची व महाराष्ट्राची प्रगती होईल. जिजाऊ-सावित्री-अहिल्या-रमाई यांचा आदर्श ठेवून यापुढची वाटचाल प्रत्येकाला करावी लागेल, हाच 'जागतिक महिला दिना'चा आपण सर्वजण संकल्प केला पाहिजे. *'जोपर्यंत घराघरात आदर्श जिजाऊ घडणार नाही, तोपर्यंत शिवाजी जन्माला येणार नाही.'* महाराष्ट्राला संभाजी ब्रिगेड शिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे जास्तीत जास्त तरुण महिला-मुली आणि पुरुषांनी संभाजी ब्रिगेड मध्ये सहभागी व्हावं. संभाजी ब्रिगेडचा झेंडा हातात घेऊन विचारांची 'राजकीय क्रांती' करण्यासाठी एकत्र यावे... असे मत संभाजी ब्रिगेड'चे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले. 


तसेच *संभाजी ब्रिगेड कायम महिला रक्षणासाठी काम करेल, आणि महिलांचा सदैव सन्मान करेल...* असे मत संभाजी ब्रिगेडचे पुणे शहर कार्याध्यक्ष संदिप लहाने पाटील यांनी व्यक्त केले.


*जागतिक महिला दिना निमित्त सौ. जान्हवी गाडेकर, रोहिणी भोसले, अनुराधा जाधव, मनीषा झोपे, स्मिता गायकवाड, शितल लहाने पाटील, अनिता गायकवाड, पूजा भोंडवे, शोभा गायकवाड, आश्विनी वाघ, संध्या शिंदे, रुपाली गायकवाड यांचा 'राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब' यांची प्रतिमा देऊन  सन्मान करण्यात आला.🌹*


*यावेळी विचारपिठावर...* संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, सौ. स्वाती टेळे, सचिव महादेव मातेरे, पुणे शहर कार्याध्यक्ष संदिप लहाने पाटील, भोर तालुकाध्यक्ष गणेश चऱ्हाटे, जोतिबा नरवडे, पुणे म.न.पा. स्विकृत नगरसेवका संजीवनीताई जाधव, जिजाऊ ब्रिगेडच्या दिपाली कवडे, बाळू थोपटे, विठ्ठल सुर्यवंशी आदी उपस्थित होते. 


_स्थळ - सुभाष चंद्र बोस मंगल कार्यालय मांजरी रोड, हडपसर, पुणे_ येथे कार्यक्रम पार पाडण्यासाठी संजय बाबळसुरे, महेश पवार, विशाल लहाने पाटील, गणेश थोरात, अशोक देशमुख, तात्या घिगे, शरद वारे, नैतिक लहाने आदी कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले


जय जिजाऊ... जय शिवराय...!!


*संभाजी ब्रिगेड हडपसर, पुणे.*


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*