सरकारने *'शिवभोजन थाळी'* गरजू व उपेक्षित विद्यार्थी व लोकांसाठी सुरू करावी. *अन्यथा विद्यार्थ्यांचा भूकबळी होईल.*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


सरकारने *'शिवभोजन थाळी'* गरजू व उपेक्षित विद्यार्थी व लोकांसाठी सुरू करावी. *अन्यथा विद्यार्थ्यांचा भूकबळी होईल.*


सरकारने सुरू केलेली 'शिवभोजन' थाळी आज संकट काळात गरजेची आहे. जी मुलं-मुली सध्या पुण्यात अडकून बसलेले आहेत किंवा ज्यांच्याकडे अन्नधान्य उपलब्ध नाही, अशा लोकांची उपासमार होत आहे. संभाजी ब्रिगेड चारशे ते साडेचारशे लोकांना जेवण पुरवण्यासाठी प्रयत्नशील आहे. संभाजी ब्रिगेडचा 55% अपंग असलेला कार्यकर्ता दररोज १० लोकांना मोफत जेवण पुरवतो. परंतु चौका-चौकात पोलीस हातात काठ्या घेऊन उभे असल्यामुळे जेवणाच्या डब्यांची मोफत सेवा पुरवणे कठीण व अवघड आहे. सरकार जे कठोर पावले उचलत आहे ते स्वागतार्ह आहे. परंतु या सगळ्या संचारबंदी मध्ये *'ज्यांना अन्न मिळत नाही, त्यांचा घरातच भूकबळी होण्याची शक्यता दाट आहे.'* यामुळे करण्या पेक्षा जास्त लोक मरतील. त्यामुळे संभाजी ब्रिगेडची सरकारला 'विनंती' आहे की, आपण सुरू केलेली शिवभोजन थाळीचे योग्य नियोजन करून विद्यार्थी-विद्यार्थिनी व उपेक्षित गरजू लोकांना ती घरपोच मिळेल अशी व्यवस्था करावी. घरात बसलेले आमदार-खासदार व स्थानिक नगरसेवक आणि सामाजिक संस्था, संघटना यांना सोबत घेऊन शिवभोजन थाळीची योजना राबवली तर गर्दीही होणार नाही आणि लोकांच्या पोटात पोटभर अन्न जाईल. राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे साहेब यांनी आमच्या विनंती' चा विचार करावा. संभाजी ब्रिगेड ला योग्य जबाबदारी द्यावी ही विनंती.


पुण्यात 'जेवण' सुद्धा जीवनावश्यक बाब आहे.


- संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड, पुणे.