एकीचे बळ, माझी टाळी देशहितासाठी हा उपक्रम यशस्वी.....

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


कृपया प्रसिद्धी साठी.,
एकीचे बळ, माझी टाळी देशहितासाठी हा उपक्रम यशस्वी.....
संपूर्ण विश्वावर कोरोना संसर्गजन्य महामारी रोगाचे सावट पसरल्यामुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत झाला आहे. अशा काळात जनतेच्या हितासाठी योग्य निर्णय घेणारे  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, चोवीस तास जनतेच्या सेवेत असणारे डॉक्टर, परिचारिका (नर्स), पोलीस बांधव, होमगार्ड, जनतेला योग्य माहिती पुरवणारे पत्रकार, रुग्णवाहिकांचे चालक, अग्निशामक दलाचे कर्मचारी, आपत्कालीन व्यवस्थेतील कर्मचारी तसेच अनेक जण कळत-नकळत या रोगापासून नागरिकांचा बचाव होण्यासाठी अहोरात्र सेवा करत आहेत. त्या सर्वांचे तसेच दिनांक 22/3/2020 रोजी कर्फ्यू च्या काळात संध्याकाळी पाच वाजता
"एकामागून एक वाजली टाळी,
सोबत वाजली जोरदार थाळी,
कोरोना वर आली,
पळून जाण्याची पाळी."
हा उपक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी राबवून या उपक्रमामध्ये देशातील नागरिकांनी दिलेला भरघोस प्रतिसाद हे भारतीय एकीचे बळ दाखवून देतो. अशा सर्व देशवासीयांनी लोकहिताचे कर्तव्य बजावले आहे. अशा सर्व देशवासियांना देशावरील प्रेम निष्ठा, जिव्हाळा, एकजुट व एकोपा दाखवल्याबद्दल सर्व भारतीय देशवासीयांच्या प्रेमाला व उस्फुर्त प्रतिसादाचे अभिनंदन. असे अनेक महामारी रोग आले पण भारतीयांन पुढे त्यांचा निभाव लागला नाही. जय हिंद.! जय भारत.! भारत माता की जय.!
अनिल बाळासाहेब अगावणे
रा. नारायण पेठ, पुणे


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com


मेलवर पाठविणे बंधनकारक*


Popular posts
४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image
तुम्ही जातीव्यवस्था संपवा, आम्ही आरक्षण सोडतो. डॉ. राजन माकणीकर
Image
डॉ. वैभव लुंकड ( आरोग्यदूत ) सामाजिक कार्यकर्ते पुणे शहर यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी 
Image
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यात  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून अंतिम वर्षाच्या परीक्षा तयारीचा आढावा
Image