*उद्योग आस्थापनांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना
निवासस्थानातून कामे करण्याची परवानगी द्यावी*
- जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे, दि. 15 :- कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून पुणे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील ज्या उद्योग आस्थापनामध्ये जसे माहिती तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर आदिंसारख्या सेवा आणि इतर उद्योग क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांना त्यांच्या निवासस्थानातूनच त्यांचे कार्यालयीन कामे करता येणे शक्य आहे. त्यामुळे संबंधित उद्योग आस्थापनाच्या उत्पादन किंवा सेवा आणि दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार नसेल अशा उद्योग आस्थापनांनी त्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 31 मार्च 2020 पर्यंत त्यांच्या निवासस्थानातून कार्यालयीन कामे करण्याबाबत परवानगी देण्याबाबतचा योग्य तो निर्णय तात्काळ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी परिपत्रकान्वये केले आहे.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 नुसार 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2, 3, व 4 मधील तरतूदींची अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केली आहे, या नियमावलीमध्ये जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी घोषित केले आहे, त्यानुसार जिल्हाधिकारी राम यांनी आवाहन केले आहे.
0000
उद्योग आस्थापनांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवासस्थानातून कामे करण्याची परवानगी द्यावी* - जिल्हाधिकारी नवल किशोर राम