*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*शेतकरी संघटनेच्या कांदा परिषदेतील ठराव*
चांदवड, जि. नाशिक. दि. १ मार्च २०२०.
चांदवड येथे शेतकरी संघटनेने आयोजित केलेल्या कांदा परिषदेमध्ये सर्वानुमते खालील ठराव करण्यात आले.
*ठराव क्र.१*- ठराव करण्यात येतो की भारत सरकारने कांदा उत्पादक शेतकर्यांच्या हिता आड येणारे धोरण न ठरवता त्यंच्या हिताचे धोरण अवलंबावे.
*ठराव क्र २*- कांद्याचे भाव नियंत्रित करण्यासाठी निर्यातबंदी, साठ्यांवरील मर्यादा, वाहतुकी वरील मर्यादा, परदेशातुन महाग कांद्याची आयात अशी उपाय योजना करु नये.
*ठराव क्र ३* - कांदा व्यापारातील सरकारी हस्तक्षेप कायम स्वरुपी बंद करावा.
*ठराव क्र ४* - कांद्यावर प्रक्रिया करणार्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी जमिन बिनशेती करण्याची शर्त न ठेवता, नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यात यावी.
*ठराव क्र ५* - कांद्यावर प्रक्रिया करण्या उद्योजकांना, शेतकरी उत्पादक कंपन्यांना, शेतकरी गटांना वित्त संस्थांकडुन पुरेसे भांडवल पुरवण्यात यावे. या कामी उद्योजकाच्या किंवा उत्पादक कंपनीच्या सभासदांच्या शेती कर्जाचा अडसर येऊ नये.
*ठराव क्र ६* - शेतीला सिंचनाची गरज असते व विज वितरण कांपनी शेतीसाठी रात्रीची वीजपुरवठा करत आहे. सध्या ग्रामिण भागात झालेला वन्य प्राण्यांचा सुळसुळाट, विजेचा लपंडाव व शेतकर्यांची शारिरीक व मानसिक पिळवणुक पाहता कांद्या पिका सहीत सर्व शेतीसाठी दिवसा विज पुरवठा करण्यात यावा.
*ठराव क्र. ६*- राज्यातील व देशातील कांदा लागवड व उत्पादनाची अचुक माहिती शेतकरी, व्यापारी, निर्यातदार व प्रशासनाला वेळेवर उपलब्ध होत रहावी यासाठी सरकारने दर पंधरवाड्याला कांदा लागवडीची व अपेक्षित उत्पादनाची माहीती उपलब्ध करुन देण्याची जवाबदारी पार पाडावी
*ठराव क्र ७* - शेतीला सिंचनाची गरज असते व विज वितरण कांपनी शेतीसाठी रात्रीची वीजपुरवठा करत आहे. सध्या ग्रामिण भागात झालेला वन्य प्राण्यांचा सुळसुळाट, विजेचा लपंडाव व शेतकर्यांची शारिरीक व मानसिक पिळवणुक पाहता कांदा पिका सहीत सर्व शेतीसाठी दिवसा विज पुरवठा करण्यात यावा.
अनिल घनवट
अध्यक्ष, शेतकरी संघटना
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*