शिवपुत्र राजाराम महाराज 🚩"  शिवाजी महाराजांच्या  तृतीय पत्नी राणी सोयराबाई यांच्या पोटी 24 फेब्रुवारी 16 70 रोजी राजाराम महाराजांचा जन्म झाला .

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


"🚩शिवपुत्र राजाराम महाराज 🚩"
 शिवाजी महाराजांच्या  तृतीय पत्नी राणी सोयराबाई यांच्या पोटी 24 फेब्रुवारी 16 70 रोजी राजाराम महाराजांचा जन्म झाला .
*सभासद बखरीत राजाराम महाराजांच्या जन्माविषयी मजेशीर कथा सांगितली आहे. सोयराबाई सुपुत्र झाला तो पालता निपजला राजास वर्तमान सांगितले, तेव्हा राजे म्हणाले की दिल्लीची पातशाही पालथी घालेल*  ज्योतिषी म्हणाले हा मुलगा थोर राजा होईल. शिवाजी राजाहून विशेष कीर्ती होईल .म्हणून मग शिवाजी महाराजांनी राजाराम नाव ठेवले. राजाराम महाराजांची प्रकृती मुळातच नाजूक होती .स्वभाव मनमिळावू व सौम्य होता .संभाजी महाराजांची शरीर प्रकृती मजबूत व स्वभाव मनस्वी तापट होता. बखरकारांनी त्यांना उग्रप्रक्रृती म्हणून संबोधले होते. महाराजांच्या या दोन्ही पुत्रांच्या शरीर प्रकृतीचा व स्वभाव प्रकृतीचा मराठेशाहीच्या इतिहासावर परिणाम झाल्याचे दिसून येते .सोयराबाईं राणीसाहेबांची राजकारण जेव्हा रायगडावर सुरू झाली तेव्हा, त्यामधील डावपेच समजण्याचे राजाराम महाराजांचे वय नव्हते .पुढे मोठे झाल्यावर सुद्धा त्यांनी वडील बंधू व भावजय यांच्याविषयी कटू भावना धरली नाही. संभाजीराजांच्या हत्ये नंतर राजसिंहासनावर बसल्यावरही त्यांच्याठायी राणी येसूबाई विषयी आदर भाव व शाहू महाराज यांच्या विषयी ममतेची भावना होती. राजाराम महाराजांना राज्य अधिकाराची आसक्ती कधीच  नव्हती. मराठ्यांच्या गादीवर आपला पुत्र बसावा अशी सोयरा बाई राणीसाहेबांची महत्त्वकांक्षा होती. त्यांच्या हयातीत ही अपेक्षा  फलद्रूप झाली नाही. पण दैवगतीने गादीवर बसण्याचा योग *जेव्हा त्यांच्या पुत्रास आला तेव्हा त्यांनी या गादीचा खरा वारस मोगलांच्या कैदेतील शाहू आहेत मी नव्हे असा भाव व्यक्त केला. यावरून राजाराम महाराजांचे व्यक्तिमत्त्व कसे होते ते लक्षात येईल*. राजाराम महाराजांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीसच रणनीतीने व राजनीतीने आपल्या शत्रूला जबरदस्त शह दिला .स्वराज्याची भूमी  विजयी मोगल सैन्यांनी व्यापली असता, महाराष्ट्रातून गुप्तपणे दूर जिंजीकडे कर्नाटकात निसटुन  त्यांनी तिथे राजधानी स्थापन केली.  आणि त्यामुळे कर्नाटकात दुसरी रणनैतिक आघाडी उभारली गेली .बादशहाला मोठ्या प्रमाणावर आपले लष्कर कर्नाटकात पाठवावे लागले याचा परिणाम असा झाला की, महाराष्ट्रात स्वराज्यावर आलेला मोगली आक्रमणाचा दबाव एकदम कमी झाला. शत्रूचे चित्त द्विधा करण्यात मराठे यशस्वी झाले. राजाराम महाराजांच्या या राजनितीने व रण नीतीने मराठ्यांच्या फौजा नाशिक पासून तंजावर पर्यंत मोगलांना धूळ चारून विजयी घोडदौड करत होत्या. छत्रपती राजाराम महाराजांच्या व्यक्तिमत्वातील सर्वात तेजस्वी पैलू म्हणजे अप्रतिम मुत्सद्देगिरी ,या मुत्सद्देगिरीमुळे त्यांनी मोगलांशी लढताना कर्नाटकातील नायकांचे सहकार्य मिळवले. जिंजी सारख्या आठ नऊशे मैल दूर असलेल्या प्रदेशातून राजाराम महाराजांनी औरंगजेबाविरुद्ध दोन आघाड्या उघडल्या होत्या .जवळ पैसे नाही, सैन्य नाही ,सरदार नाही अशा काळात सरदारांना परत बोलावण्यासाठी राजाराम महाराजांनी वतनदारी द्यायला सुरुवात केली .वतनदारीच्या आमिषा मूळे जुने लोक परत स्वराज्यात यायला सुरुवात झाली. सत्तेचे योग्य विकेंद्रीकरण करून सरदारांना सेनापतींना हुकूमत पन्हा,वजारतमाब, हिंमत बहादुर असे किताब ,सरंजाम जहागिर्या देऊन सर्वांना  आपलेसे करून घेतले.  राजाराम महाराजांच्या भोवती 40 हजार घोडदळ, पंचवीस हजार पायदळ ,जमा झालेहोते
  त्यापैकी 15 हजार घोडदळ व 25 हजार पायदळ त्यांनी केसोत्रिमलच्या  नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पाठवण्याचा उल्लेख सापडतो. या सैन्याबरोबर राजाराम महाराजांनी एक लाख होनांचा खजिनाही पाठवला होता असे दिसते  याच कुमकेच्या बळावरच पुढे महाराष्ट्रातील मराठ्यांनी 16 90 च्या सालात मोठमोठे विजय संपादन केले. *औरंगजेबाच्या स्वारीच्या अत्यंतीक संकट काळात राजाराम महाराजांनी हिम्मत न हरता दक्षिण जिंकून बादशहाची ऊत्तरेकडील राजधानी दिल्ली जिंकण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली*
 यासाठी हणमंतराव व कृष्णाजी घोरपडे यांना सहालक्ष होन सरंजाम देण्याचा निश्चय केला होता.  आपल्या कारकीर्दीच्या अखेरीस औरंगजेबाच्या मोहिमेला शह देण्याच्या हेतूने राजाराम महाराजांनी खानदेश वऱ्हाडचे मोहीम हाती घेतली होती. पण प्रकृतीने त्यांना साथ दिली नाही. त्यांना ही मोहीम अर्ध्यावरच टाकून सिंहगडावर परतावे लागले .तेथे त्यांचा मुक्काम दोन महिने राहिला ,परंतु या काळात त्यांची प्रकृती बिघडत गेली व अवघ्या तिसाव्या वर्षी 3 मार्च 1700 रोजी मराठ्यांच्या या तिसऱ्या छत्रपतींचा दुर्दैवी अंत झाला. *तब्बल 11 वर्षे राजाराम महाराजांनी राज्य केले अशा या "शिवपुत्र राजाराम महाराजांना आमचा मानाचा मुजरा "*
  जय जिजाऊ जय शिवराय


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*