अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुल येथे 'परीक्षा पे चर्चा' चे थेट प्रक्षेपण* 

प्रेस नोट 
  *अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुल येथे 'परीक्षा पे चर्चा' चे थेट प्रक्षेपण*
 पुणे :
    महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुल(आझम कॅम्पस) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  'परीक्षा पे चर्चा ' या संवाद कार्यक्रमाचे  थेट प्रक्षेपण  विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.हा कार्यक्रम अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुल येथील डॉक्टर पी ए इनामदार इ लर्निंग लॅब येथे भव्य स्क्रीनवर विध्यार्थ्यांना दाखवण्यात आला.या कार्यक्रमात प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती परवीन शेख
व इतर शिक्षकवृंद सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना ऑनलाइन कॉन्फरन्स द्वारेविद्यार्थ्यांशी संवाद साधला.या कार्यक्रमात त्यांनी परीक्षा जीवनाची या विषयासह अनेक विषयांना स्पर्श
केला.तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे.त्याचा सुयोग्य वापर करा.पण त्याच्या अधीन होऊ नका.म्हणजेच त्याचे
गुलाम बनू नका असाही संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.दिवसातील काही वेळ आपल्या मातापित्याबरोबर
व्यतीत करावा हा मोलाचा उपदेश ते दयायला विसरले नाहीत
या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी विध्यार्त्याना नैतिक मार्गदर्शन केले.