मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याची सांगता*

Press note


*मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याची सांगता*
..................................
*भाषा संवर्धनाचे एमसीई सोसायटीचे प्रयत्न पथदर्शक : हर्षद जाधव ( अवर सचिव )*


पुणे :


एम.सी.ई. सोसायटीच्या 
स्पोकन मराठी अॅकॅडेमी तर्फे मराठी संवर्धन पंधरवड्याचा सांगता समारंभ १३ जानेवारी रोजी सायंकाळी 
आझम कॅम्पस, पुणे कॅम्प येथे झाला.


मराठी भाषा विभागाचे अवर सचिव हर्षद जाधव,  विश्वकोष निर्मिती मंडळाचे सहायक सचिव श्यामकांत देवरे,  कक्ष अधिकारी राजश्री बापट, महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.लतिफ मगदूम, मशकुर शेख, अब्बास शेख उपस्थित होते.डॉ.लतीफ मगदूम हे  कार्यक्रमाच्या  अध्यक्ष स्थानी होते.


 प्रमुख पाहुण्यांचा परिचय अमिता डंबीर यांनी करून दिला. जितेंद्र देवकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉक्टरेट पदवी मिळवणाऱ्या लतीफ मगदूम यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.मराठी संवर्धन पंधरवडा उपक्रमाचे हे तिसरे वर्ष होते.


हर्षवर्धन जाधव म्हणाले, ' मराठी भाषा जतनाचे प्रयत्न महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीमध्ये होत आहे. त्यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. मंत्रालयात देखील तीन दिवस पंधरवडा साजरा केला जातो.  मुंबईत हिंदी, इंग्रजी भाषेचे वर्चस्व झाले आहे. त्या मानाने येथील प्रयत्न आमच्या विभागाचा उत्साह वाढविणारा आहे.हे प्रयत्न पथदर्शक आहेत.


श्यामकांत देवरे म्हणाले,' राज्यभरातील कार्यक्रमात येथील कार्यक्रम सरस ठरला. मराठी भाषा विभागाला यातून ऊर्जा प्राप्त झाली. 


डॉ.लतिफ मगदूम म्हणाले,'    भाषा जगवायची असेल तर विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती जागवली पाहिजे. मराठी शाळा ओस पडणे ही चिंतेची बाब आहे. सर्वांनी एकत्र येऊन भाषा. जगवली पाहिजे.
................................................


Photo line :  मराठी संवर्धन पंधरवडा मधील यशस्वी स्पर्धकांसमवेत अवर सचिव हर्षद जाधव, सहायक सचिव श्यामकांत देवरे, राजश्री बापट, लतीफ मगदूम, नूरजहाँ शेख


काळा शर्ट चष्मा हर्षद जाधव, पांढरा शर्ट चष्मा श्यामकांत देवरे