⭕दिल्ली आपचीच केजरीवाल पुन्हा पडणार भा.ज.पा.ला भारी...
नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता दिल्लीतील जनतेचा संभाव्य कल सांगणारे ओपिनियन पोल प्रसिद्ध होऊ लागले आहेत. दरम्यान, ए.बी.पी. न्यूज आणि सी-व्होटरने प्रसिद्ध केलेल्या ओपिनियन पोलमधून दिल्लीमध्ये आपचीची सत्ता कायम राहणार असल्याचा कल दर्शवला आहे. दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्ष पुन्हा एकदा मोठ्या बहुमतासह विजयी होणार असून, भा.ज.पा. आणि काँग्रेसला दोन आकडी जागाही जिंकता येणार नाहीत, असा अंदाज या ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आला आहे.ए.बी.पी. न्यूज आणि सी व्होटरने आपल्या ओपिनियन पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार भा.ज.पा.ला 59 जागा मिळतील. तर अरविंद केजरीवाल यांच्यासमोर मोठे आव्हान उभे करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भा.ज.पा.ला केवळ 8 जागांवर समाधान मानावे लागेल, असा अंदाज या ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आला आहे. गेल्या निवडणुकीत भोपळाही फोडता न आलेल्या काँग्रेसला यावेळी काहीसा दिलासा मिळणार असून, काँग्रेसला 3 जागा मिळतील, असा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये वर्तवला आहे.मतदानाच्या टक्केवारीचा विचार केल्यास आम आदमी पक्षाला 53 टक्के, भा.ज.पा.ला 26 टक्के आणि काँग्रेसला 5 टक्के मते मिळतील. तर 16 टक्के मते इतर पक्षांच्या खात्यात जातील, असे ए.बी.पी. न्यूज,-सी व्होटरच्या ओपिनियन पोलमध्ये म्हटले आहे.